पाच उपजिल्हाधिका:यांची जिल्ह्यात पदोन्नतीने नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:26 IST2019-09-11T11:26:02+5:302019-09-11T11:26:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपजिल्हाधिकारी पदाच्या पाच जागांवर तहसीलदारांमधून पदोन्नती मिळालेल्या उपजिल्हाधिका:यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारीपदी ...

पाच उपजिल्हाधिका:यांची जिल्ह्यात पदोन्नतीने नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उपजिल्हाधिकारी पदाच्या पाच जागांवर तहसीलदारांमधून पदोन्नती मिळालेल्या उपजिल्हाधिका:यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारीपदी महेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तहसीलदार संवर्गाच्या अधिका:यांना नुकतीच उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. अशा अधिका:यांना एका आदेशान्वये पदस्थापना देण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात पाच नवे उपजिल्हाधिकारी येणार आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारीपदी महेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी नंदुरबार व नवापूर येथे ते तहसीलदार म्हणून होते.
बबन पुंजाराम काकडे यांची सरदार सरोवर प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारीपदी, के.टी.कडलग यांची सरदार सरोवर प्रकल्प तळोदा येथे, बी.एम.क्षिरसागर यांची रोहयो उपजिल्हाधिकारीपदी, एम.टी.सुधोळकर यांची नंदुरबारच्या उपविभागीय अधिकारीपदीपदी तर संदीप कदम यांची गा:हाणे निराकरण प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात हे सर्व अधिकारी रुजू होणार आहेत.