नंदुरबार शहरातील पाच तर मोलगीत एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:12 IST2020-06-23T18:50:14+5:302020-06-24T12:12:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पाच तर मोलगी ता़ अक्कलकुवा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ सलग ...

Five in the city and one positive in Molgeet | नंदुरबार शहरातील पाच तर मोलगीत एक पॉझिटिव्ह

नंदुरबार शहरातील पाच तर मोलगीत एक पॉझिटिव्ह


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील पाच तर मोलगी ता़ अक्कलकुवा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ सलग दुसऱ्या दिवशी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे़
धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलेल्या स्वॅबचा रिपोर्ट मंगळवारी प्रशासनाला प्राप्त झाला़ यात नंदुरबार शहरातील गिरीविहार परिसरातील ५६ वर्षीय पुरुष, मंगळ बाजार परिसरातील सिद्धीविनायक चौक परिसरातील ७७ वर्षीय महिला, धर्मशांती नगरातील ३६ आणि ३४ वर्षीय पुरुष व ९ वर्षीय बालक यांना कोरोनाची लागण झाली आहे़ दरम्यान मोलगी येथील २७ वर्षीय पोलीस कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातील धर्मशांती नगरातील तिघे आधीच जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याची माहिती देण्यात आली आह़े तर गिरीविहार येथील ५६ वर्षीय पुरुषाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़ मोलगी येथील रुग्ण येथील रुग्णही आयसोलेश वॉर्डात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान गिरीविहार येथील ५६ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ धर्मशांती नगरातील तिघे रुग्ण हे सिंधी कॉलनीतील दोघींच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात आले आहे़ तर सिद्धीविनायक चौकातील वृद्धेच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़


मंगळ बाजार परिसरातील सिद्धीविनायक चौकातील ७७ वर्षीय बाधित महिलेच्या संपर्कातील एक व्यक्ती जिल्हा परिषदेत नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे़ यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे धाबे दणाणले असून संबधितांना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत़ धर्मशांतील नगरातील तिघांच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे़ सिंधी कॉलनी व परिसरात रुग्ण आढळून आल्यानंतर पालिकेकडून फवारणीला वेग देण्यात आला आहे़


मोलगीतील पोलीस कर्मचारी बाधित

दरम्यान मोलगी येथील एक रुग्ण डिस्चार्ज झाल्याची कारवाई होत असताना तेथीलच दुसऱ्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मोलगी येथील नव्याने बाधित २७ वर्षीय कोरोना रुग्ण हा पोलीस कर्मचारी असून बाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला खापर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते़ त्याचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मोलगी येथील पत्नी आणि मुलगी यांनी खापर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आणले जात आहे़ बाधित पोलीस कर्मचाºयाची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Five in the city and one positive in Molgeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.