नंदुरबारात अज्ञातांनी जाळल्या पाच दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:04 IST2018-12-03T13:04:11+5:302018-12-03T13:04:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील शाळा क्रमांक एक जवळील कॉम्पलेक्ससमोर लावण्यात आलेल्या पाच दुचाकी रात्री अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची ...

Five bikes burned by the infidels in Nandurbar | नंदुरबारात अज्ञातांनी जाळल्या पाच दुचाकी

नंदुरबारात अज्ञातांनी जाळल्या पाच दुचाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील शाळा क्रमांक एक जवळील कॉम्पलेक्ससमोर लावण्यात आलेल्या पाच दुचाकी रात्री अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याबाबत शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे दुचाकीधारकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
नंदुरबारातील शाळा क्रमांक एक जवळ शॉपींग कॉम्पलेक्समध्ये असलेल्या गॅरेज समोर दुरूस्तीसाठी आलेल्या दुचाकी उभ्या करण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी पाच दुचाकी साखळीने बांधलेल्या होत्या. शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी या पाचही दुचाकी जाळल्या. जळालेल्या दुचाकींचा केवळ सांगाडा शिल्लक असल्याचे पहाटे लक्षात आले. तातडीने शहर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून नोंद केली. 
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुचाकी धारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दुचाकी जाळणा:या संशयीतांना पोलिसांनी जेरबंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील शहरातील काही भागात अशा प्रकारे वाहने जाळण्याचा प्रय} झाला होता. त्यामुळे अशा माथेफिरूंचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

Web Title: Five bikes burned by the infidels in Nandurbar