बोर्डाच्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 01:24 PM2020-09-26T13:24:48+5:302020-09-26T13:31:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावीचे अनुत्तीर्ण २,४७४ तर बारावीचे तीन हजार ४७ विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाते ...

Five and a half thousand students of the board were hanged | बोर्डाच्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

बोर्डाच्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावीचे अनुत्तीर्ण २,४७४ तर बारावीचे तीन हजार ४७ विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाते किंवा कसे याबाबत संदिग्धता आहे. फेरपरिक्षा घेण्याचे अद्याप काहीही नियोजन नसल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणाीला आहे. दरवर्षी जून महिन्यात निकाल लागून जुलै, आॅगस्ट महिन्यात फेरपरिक्षा व आॅक्टोबरमध्ये निकाल असे नियोजन असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नाही. यंदा मात्र कोरोनामुळे निकाल उशीरा व आता फेरपरिक्षाही उशीराने होण्याचे चित्र आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीचा एक पेपर होऊ शकला नव्हता. शिवाय दहावीसोबतच बारावी परीक्षेचे पेपर तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासही दीड ते दोन महिने उशीर झाला होता. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला होता. आता अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरिक्षांबाबतही मंडळाकडून काहीच सुतोवाच नसल्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थीही संभ्रमात आहेत. परीक्षा कधी होतील, यंदाचे वर्ष वाया जाईल का? यासह इतर प्रश्न या विद्यार्थी व पालकांना सतावत आहेत.
एक किंवा दोन विषय
गेल्या शैक्षणिक वर्षापासून अंतर्गत गुणांचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जात असल्यामुळे यंदा अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले. शिवाय केवळ एक किंवा दोन विषयातच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यातही भाषा विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधीक आहे. त्यानंतर गणित विषयात अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण आहे.
एका विषयासाठी वर्ष वाया
अनुत्तीर्ण झालेले दहावी व बारावीचे सर्वाधिक विद्यार्थी अर्थात ९० टक्के विद्यार्थी हे केवळ एका विषयात अनुत्तीर्ण आहेत. त्यामुळे फेरपरिक्षा उशीराने झाल्यास एका विषयासाठी या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेर परिक्षांचे नियोजन लवकर व्हावे अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांची आहे.
बोर्डाकडून सुतोवाच नाही
फेरपरीक्षा संदर्भात अद्याप काहीही सुतोवाच नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे नियोजन उशीराने होण्याची शक्यता आहे. साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्थात दिवाळीनंतरच या परीक्षा होतील अशी शक्यताही वर्तविली जात आहे.
प्रवेश मिळणार का?
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जर उशीराने झाली तर त्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळणार किंवा कसा याबाबत संभ्रम आहे. दरवर्षाप्रमाणे आम्हाला ही चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळावा अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांची आहे.
फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेले बहुतेक विद्यार्थी हे आयटीआय किंवा तंत्र शिक्षणासाठी प्रविष्ठ होतात. अशा ठिकाणी रिक्त जागांवर अशा विद्यार्थ्यांना सामावले जात असते असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
४दहावीच्या २० हजार ८५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन हजार ४७४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.१३ टक्के होती. चार हजार ३४ विद्यार्थी विशेष प्राविण्य तर सात हजार ८२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
४बारावीच्या तिन्ही शाखा अर्थात कला, विज्ञान व वाणिज्य मिळून १५ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार ४१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर तीन हजार ४७ विद्यार्थी अनुत्तीण झाले. ७९१ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून तर पाच हजार २११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
 

Web Title: Five and a half thousand students of the board were hanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.