वॉटर कप स्पर्धेत कोठली प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:31 IST2019-08-12T12:30:57+5:302019-08-12T12:31:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत कोठली, ता. नंदुरबार ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. तर नंदुरबार ...

First in the water cup competition | वॉटर कप स्पर्धेत कोठली प्रथम

वॉटर कप स्पर्धेत कोठली प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत कोठली, ता. नंदुरबार ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. तर नंदुरबार तालुक्यातीलच न्याहली व रनाळे खुर्द ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात या ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. 
सत्यमेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा यंदाही नंदुरबार व शहादा तालुक्यात राबविण्यात आली. या स्पर्धेत अनेक गावांनी सहभाग घेतला होता. जलसंधारणातून मनसंधारणाच्या स्पर्धेत यावर्षी कोठली खुर्द या गावाला तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे दहा लाखाचे    बक्षीस मिळाले आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित बालेवाडी पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या गावाला पाणी फाऊंडेशनचे अमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ यांच्या उपस्थितीत सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अभिनेता    पुष्कर श्रोती यांच्या हस्ते देण्यात आला.  यासोबतच तालुक्यातून जलसंधारणाची उत्तम कामे करणा:या न्याहाली गावाला द्वितीय पुरस्कार तर रनाळे खुर्द गावाला तृतीय पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
 

Web Title: First in the water cup competition