नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पिटलमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST2021-07-28T04:31:47+5:302021-07-28T04:31:47+5:30

शहरातील पहिलेच १०० खाटांचे अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटीज स्मित हॉस्पिटल येथे विविध सुपर स्पेशालिटी उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध असून अल्पावधीतच जिल्ह्यातील ...

For the first time in Nandurbar district, joint transplant surgery was successful at Smit Hospital | नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पिटलमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पिटलमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

शहरातील पहिलेच १०० खाटांचे अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटीज स्मित हॉस्पिटल येथे विविध सुपर स्पेशालिटी उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध असून अल्पावधीतच जिल्ह्यातील नागरिकांनी या हॉस्पिटलमध्ये विविध उपचारांचा लाभ घेतला आहे. सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी विशेष मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सर्व मानकांसह व नाशिक, सुरत आदी मोठ्या शहरांच्या धर्तीवर उपलब्ध आहे. सुरत येथील प्रसिद्ध सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. केविन चोक्सी, नंदुरबार येथील प्रसिद्ध अस्थिरोग विशारद डॉ. त्र्यंबक पटेल, डॉ. जयवंत पटेल, भूलतज्ञ डॉ. जयेश जैन यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. आता फिटनेस फिजिशियन डॉ. गौरव तांबोळी यांच्या देखरेखीखाली रुग्ण आहे. अस्थिरोग विभागातील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया स्मित हॉस्पिटल येथे कायमस्वरूपी होत असून सांधेरोपणासोबतच जिल्ह्यात प्रथमच ऑर्थोस्कॉपी शस्त्रक्रियाही पार पडली. ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत मोफत उपलब्ध आहे. तसेच सर्व शस्त्रक्रिया कॅशलेस असून सर्वच इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस उपलब्ध आहेत. स्मित हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य तीन ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे.

Web Title: For the first time in Nandurbar district, joint transplant surgery was successful at Smit Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.