जिल्ह्यातील व्यवहार पूर्वपदावर येण्याचा पहिला टप्पा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:17 PM2020-05-22T12:17:05+5:302020-05-22T12:17:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शुक्रवार, २२ मे पासून जिल्ह्यातील व्यवहार पूर्वपदावर येण्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. नवापूर ...

The first phase of resumption of business in the district is underway | जिल्ह्यातील व्यवहार पूर्वपदावर येण्याचा पहिला टप्पा सुरू

जिल्ह्यातील व्यवहार पूर्वपदावर येण्याचा पहिला टप्पा सुरू

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शुक्रवार, २२ मे पासून जिल्ह्यातील व्यवहार पूर्वपदावर येण्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. नवापूर वगळता तीन आगारातून एकुण ५७ बस फेऱ्या सुरू होणार आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी सात वाजेदरम्यान बस सेवा सुरू राहणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील शहरी व निमशहरी भागात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान सर्व प्रकारची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यात हॉटेल, बियरबार यांचा समावेश नसेल.
नंदुरबार जिल्हा नॉन रेड झोनमध्ये असल्यामुळे चौथ्या लॉकडाऊनमध्ये अनेक बाबींची सूट देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी २२ मे पासून सुरू होणार आहे. यात महत्त्वाचे म्हणजे ग्रामिण भागातील जनतेचा दळणवळणाचा आधार असलेल्या एस.टी.बसचा समावेश आहे. याशिवाय दैनंदिन व्यवहार सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
एस.टी.धावणार
गेल्या दोन महिन्यापासून आगारात थांबून असलेली एस.टी.बस आता जिल्ह्यातील विविध भागात धावणार आहे. नवापूर वगळता नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा आगारातून अनुक्रमे २४, १६ व १७ फेºया होणार आहेत.
नंदुरबार आगारातून दररोज पहिली बस सकाळी ८ वाजता शहादा, नवापूर, अक्कलकुवासाठी निघणार आहे. सकाळी आठ वाजेपासून नंदुरबार धडगाव अक्कलकुवा तळोदा या गावांत करिता शहादा आगारातून बसेस सुटणार आहेत सोशल डिस्टन्स इन च्या नियोजन करीत प्रवाशांना सुरक्षित पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती शहादा आगार प्रमुख योगेश लिंबायत यांनी दिलेली आहे
२२ मार्च रोजी पहिला जनता कर्फ्यू करण्यात आलेला होता त्याच दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या दिवसापासून २१ मे पर्यंत परिवहन महामंडळाच्या बसेस रस्त्यावर धावलेल्या नाहीत. दोन महिन्याच्या कालावधीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाव्हायरस या संसर्गजन्य प्रादुभार्वापासून जिल्हा मुक्त झाल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी जिल्हा अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू करण्याच्या आदेश दिलेल्या आहे
शहादा राज्य परिवहन महामंडळाच्या साडेसहा ते सात कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एका दिवसाला एकशे पाच फेºया मागे सुमारे ११ ते १२ लाखाचे उत्पन्न मिळत असते. मात्र या लॉकडाऊन व संचारबंदी दरम्यान शहादा आगाराला साडेसहा ते सात कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चारही आगार मिळून जवळपास २० ते २२ कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही तूट कधीही न भरून येणारी आहे.
२२ मेपासून शहादा आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सकाळी आठ वाजेपासून प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांचे पालन करीत तालुका व मोठ्या शहरांसाठी बसेस प्रवाशांना घेऊन धावण्यात येणार आहे. एका बस मध्ये पंचेचाळीस ते पन्नास प्रवाशांना बसविण्यात येणार असून जिल्ह्यातील या गावांना जाणाºया प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार, शहादा आगारप्रमुख योगेश लिंबायत यांनी केलेले आहे.


नंदुरबारसह जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात २१ तारखेपर्यंत सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास परवाणगी देण्यात आली होती. प्रतिबंधीत क्षेत्रात मात्र सर्व प्रकारचे दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याच्या सुचना आहेत.
सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या काळात एकही दुकान किंवा पेट्रोल, डिझेल पंप सुरू राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
लग्न समारंभ आणि अंत्ययात्रा यांच्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या देखील मर्यादीत करण्यात आली. दोन्ही ठिकाणी केवळ ५० जणांना अनुमती राहणार आहे.
या सर्व नियमांमधून मात्र अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, औषधी दुकाने, दूध विक्री, रुग्णवाहिका यांना वगळण्यात आले आहे.


 

Web Title: The first phase of resumption of business in the district is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.