पावणेतीन लाख खर्च करून शहाद्यात जिल्ह्यातील पहिले डेमो हाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:32+5:302021-06-24T04:21:32+5:30

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार ...

The first demo house in the district at a cost of Rs | पावणेतीन लाख खर्च करून शहाद्यात जिल्ह्यातील पहिले डेमो हाऊस

पावणेतीन लाख खर्च करून शहाद्यात जिल्ह्यातील पहिले डेमो हाऊस

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ‘डेमो हाऊस’ बांधावयाचे आहे. नंदुरबार जिल्ह्यात हे पहिलेच ‘डेमो हाऊस’ उभारले आहे. हे घरकुल उभारणीसाठी बांधकामासाठी दोन लाख आणि मजुरीसाठी ७७ हजार इतका खर्च झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाची पाहणी

गमे यांनी शहादा येथील ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाची पाहणी केली. इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण करण्यात यावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने विद्युत जोडणी आणि स्वच्छतागृहाची कामे तातडीने पूर्ण करावे. कामाचा दर्जा चांगला राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधिताना दिल्या.

यानंतर त्यांच्या हस्ते शहादा तहसील कार्यालय परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.

Web Title: The first demo house in the district at a cost of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.