पहिला दिवस संमिश्र प्रतिसादाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:23 IST2020-08-21T12:20:46+5:302020-08-21T12:23:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस.टी.ची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली, परंतु पहिल्या दिवशी प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळाला. नाशिकसाठी ...

पहिला दिवस संमिश्र प्रतिसादाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एस.टी.ची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली, परंतु पहिल्या दिवशी प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळाला. नाशिकसाठी नंदुरबार आगाराच्या चार व नाशिक आगाराच्या तीन अशा सात बसेस सोडण्यात आल्या तर धुळ्यासाठी नंदुरबार आगाराच्या चार बसेस सोडण्यात आल्या. या सर्व फेऱ्यांमध्ये एकाही फेरीत २० पेक्षा अधीक प्रवासी नव्हते.
दरम्यान, जशी प्रवाशी संख्या वाढेल तशा फेºया वाढविण्यात येतील अशी माहिती नंदुरबारचे आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली. राज्य शासनाने गुरुवार, २० आॅगस्टपासून आंतरजिल्हा बसेस वाहतुकीला परवाणगी दिली. त्यानुसार नंदुरबार, शहादा आगारातून धुळे, नाशिकसाठी बसेस सोडण्यात आल्या. सकाळी साडेआठ वाजता नाशिकसाठी बस सोडण्यात आली. त्यात आठ प्रवासी होते. त्यानंतर आगाराच्या तीन व नाशिकहून आलेल्या तीन अशा सात बसेस नाशिकसाठी सोडण्यात आल्या.
नाशिकच्या बसेसमध्ये आठ, दहा, दहा, १४ असे प्रवासी गेले. तर धुळे साठी सोडण्यात आलेल्या बसेसमध्ये १४, आठ, आठ, १७ असे प्रवासी रवाना झाले. सर्व बसेसचे सॅनिटायझेशन करूनच त्या प्रवासाला सोडण्यात येत आहेत. प्रवाशांनीही स्वत: मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहनही आगारातर्फे मनोज पवार यांनी केले आहे.
शहाद्यातही सामसूम
शहादा आगारातून सकाळी साडेआठ वाजता आगार प्रमुख योगेश लिंगायत यांच्या उपस्थितीत बस रवाना केली. पहिल्या बसफेरीत धुळे साठी केवळ चार प्रवासी होते.
शहादा शहरात शहरापासून तीन किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या नवीन बसस्थानकातून बस सेवा सुरू करण्यात आली. रोज आता धुळेसाठी सकाळी साडेआठ वाजता व दुपारी साडेबारा वाजता बस फेºया राहतील. तसेच सकाळी अकरा वाजता नासिकसाठी बस सेवा सुरू राहील. प्रायोगिक तत्त्वावर या तीन फेºया सुरू राहणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद वाढत गेल्यास इतर शहरांसाठी बस सेवा सुरू करण्यात येतील. आज सकाळी बस सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला केवळ कर्मचाऱ्यांची वर्दळ दिसत होती. प्रवाशांनी बस सेवेकडे पाठ फिरवली आहे सुरुवातीला धडगाव व मंदाने साठी बस फेºया सुरू होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. नंदुरबार साठी बस सेवा सुरू होती ती सुरूच आहे.