नमकीन पदार्थ बनविणारा कारखाना आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 11:58 IST2019-02-15T11:58:51+5:302019-02-15T11:58:57+5:30
शहाद्यातील घटना : वेळीच नियंत्रण मिळविता आल्याने मोठा अनर्थ टळला

नमकीन पदार्थ बनविणारा कारखाना आगीत खाक
शहादा : नमकीन बनविणा:या कंपनीला बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. बॉयलर किंवा सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
शहाद्यातील जुना प्रकाशा रोडवर सालदार नगर भागात सूर्या नमकीन नावाची कंपनी आहे. या ठिकाणी नमकीनचे विविध पदार्थ तयार करून ते खान्देशसह गुजरात व मध्यप्रदेशातील विविध भागात विक्री केली जाते. या कंपनीला बुधवारी रात्री 12 ते साडेबाराच्या दरम्यान अचानक आग लागली. काहींच्या म्हणण्यानुसार पहिले सिलिंडर फुटल्यासारखा आवाज आल्यानंतर लागीचे लोळ बाहेर दिसले. त्यामुळे कंपनीतील बॉयलर किंवा सिलिंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचा अंदाज आहे.
कंपनीत प्लॅस्टिकच्या पिशव्या, नमकीन बनविण्यासाठीचा कच्चा माल आणि लाकडी सामान असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिक तसेच राकेश सुभाष पाटील, संजय ताराचंद चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहादा पालिकेच्या अगिAशमन बंबासह नंदुरबार, दोंडाईचा व सातपुडा साखर कारखान्याच्या अगिAशमन बंबाला पाचारण करण्यात आले. नागरिकांनी देखील मिळेल त्या साधनांनी आग विझविण्यासाठी प्रय} केला. तीन तास अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.
कंपनी लगतच कच्च्या घरांची मोठी वसाहत आहे. परंतु वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आल्याने पुढील अनर्थ टळला. आगीच्या वेळी बघ्यांची देखील मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे आग विझविण्यासाठी बंबांना शर्तीचे प्रय} करावे लागत होते. पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते.
आगीत कंपनीचे संपर्ण शेड, स्वयंचलित मशिनरी, कच्चा माल, पक्का माल यासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तहसीलदार मनोज खैरनार, सर्कल बी. ओ. पाटील, कुकडेल भागाचे तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. शहादा पोलिसात अगिAउपद्रवान्वये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आगीच्या मुळ कारणाचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते कंपनीत सुमारे 200 कामगार काम करतात. सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेर्पयत या ठिकाणी काम चालते. कंपनीत कुणी नसतांना आग लागल्याने जिवीत हाणी टळली.
सकाळी कंपनीचा झालेला कोळसा पाहून कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गहिवरून आले. रोजगार गेल्याने अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आले.
कंपनी रहिवास भागात कशी सुरू करण्यात आली, आवश्यक त्या परवाणग्या घेण्यात आल्या होत्या काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कंपनीतून येणारी दरुगधी, वेस्टेज माल उडणे यासह इतर कारणांमुळे या भागातील नागरिकांनी कंपनीचे स्थलांतर करण्याची मागणी केली होती असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.