धानोरा येथील रोहित्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:22 IST2020-05-11T12:21:54+5:302020-05-11T12:22:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील धानोरा शिवारातील एका शेतात असलेल्या विद्युत रोहित्रातून आॅइलची गळती होत असल्याने अती तापमनात ...

Fire at Rohitra in Dhanoria | धानोरा येथील रोहित्राला आग

धानोरा येथील रोहित्राला आग

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील धानोरा शिवारातील एका शेतात असलेल्या विद्युत रोहित्रातून आॅइलची गळती होत असल्याने अती तापमनात वीजपुरवठा सुरू झाल्याबरोबर या रोहित्राने पेट घेतला. सुदैवाने आजू बाजूचे गव्हाचे पीक काढण्यात आल्यामुळे यात कुठलेही नुकसान झाले नाही. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत असे की, धानोरा शिवरातील शेतकरी संजय चौधरी यांचा शेतात वीज कंपनीचा १०० हाऊस पॉवरचे रोहित्र बसविण्यात आले आहे. येथूनच अनेक शेतकºयांच्या कृषी पंपास वीजपुरठा देण्यात आला. तथापि या रोहित्राला गळती लागल्याने त्यातून आॅईलची गळती होत होती. सद्य:स्थितीत तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. साहजिकच या वाढत्या तापमानामुळे रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लाईट आल्याबरोबर रोहित्रावर स्पार्र्कींग झाली. पहाता पहाता रोहित्राला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने संबंधीत शेतकºयाचे उसाचे पीक लहान होते. शिवाय इतर शेतकºयांचादेखील गहू काढण्यात आला होता. त्यामुळे पुढील नुकसान टळले. दरम्यान, संबंधित शेतकºयाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घटनेची माहिती देताच वायरमन तेथे तातडीने दाखल झाल्याने वेळीच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु संबंधित वीज वितरण कंपनीच्या गलथान काराभाराबाबत शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

अति तापमानामुळे रोहित्र जळाला असला तरी तो तातदीने मिळावा अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. कारण परिसरातील शेतकºयांनी ऊस, केळी व पपाईची पिके आहेत. शिवाय वाढत्या तापमानामुळे या पिकांना पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची त्वरित दखल घेऊन नव्याने रोहित्र उपलब्ध करून द्यावा. अगोदरच शेतकºयांना रोहित्रासाठी अनेक दिवस कंपनीकडे थेटे घालावे लागत असल्याचा अनुभव आहे. आता तर कंपनीच्या दुर्लक्षामुळेच हा रोहित्र जळाला असून, संबंधित अधिकाºयांनी याठिकाणी नवीन रोहित्र बसविण्याची तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा आहे. दरम्यान सदर रोहित्र जळाल्याबाबत सबंधित अभियंत्यास विचारले असता चौकशीसाठी लाईनमनला पाथवले असून, तो कशामुळे जाळाला हे नंतर सांगता येईल.

Web Title: Fire at Rohitra in Dhanoria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.