विसरवाडी येथील आगीत ६० लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:32 IST2020-09-19T12:32:35+5:302020-09-19T12:32:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : येथील ग्रामपंचायत गल्लीतील आईल रि-पॅकिंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनसह शेजारील घरे व त्यातील संसार ...

विसरवाडी येथील आगीत ६० लाखाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : येथील ग्रामपंचायत गल्लीतील आईल रि-पॅकिंगच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनसह शेजारील घरे व त्यातील संसार उपयोगी साहित्य व मशनरी सह एकूण ^६० लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे ग्रामपंचायत गल्लीत दिनेश प्रकाश जयस्वाल यांचे बालाजी इंटरप्राईजेस नावाचे आॅइल री-पॅकिंग करण्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती.
गोडाउनमध्ये आॅइलच्या ज्वलनशील पदार्थ असलेल्या टाक्या असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. या आगीत दिनेश जयस्वाल यांचे मशनरी सह गोडाऊन व इतर साहित्य पूर्णपणे जळून राख झाले. तसेच शेजारी पाच घरांना देखील या आगीने लपेट्यात घेत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य व घर जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमनापंत व नवापूरचे तहसीलदार सुनिता जºहाड यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त कुटुंबांचे सांत्वन केले व येथील तलाठी यांना नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगितले.
नुकसान झालेल्या दिनेश जयस्वाल, मंगलाबाई जयस्वाल, रज्जुबाई जयस्वाल या तीन जणांना विसरवाडी पतसंस्थेतर्फे तात्काळ प्रत्येकी एक एक लाख रुपये कर्ज स्वरूपात मंजूर करण्यात आले असे विसरवाडी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन बकाराम गावित व व्हाईस चेअरमन विजय अग्रवाल यांनी सांगितले.
४या आगीमध्ये दिनेश जयस्वाल यांच्या गोडाऊन मधील आॅइलच्या टाक्या, पाउच पॅकिंग मशीन, सिलिंग मशीन, फिलिंग मशीन, गोडाऊन यासह इतर मशनरी व साहित्य असे १६ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच मंगलाबाई श्यामलाल जयस्वाल यांचे १६ लाख ४४ हजार रुपये, रज्जूबाई प्रकाश जयस्वाल यांचे १९ लाख ७० हजार रुपये, मंजुळाबाई सदाशिव चौधरी यांचे सात लाख ५० हजार रुपये असे सर्व मिळून एकूण ६० लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले असे तलाठी नरेंद्र महाले व प्रभारी मंडळ अधिकारी जयंत वसावे यांनी तहसीलदार नवापूर यांच्याकडे सादर केलेल्या पंचनाम्यात उल्लेख केला आहे.