कचरा डेपोतील आगीने उडाली सर्वांचीच धावपळ, एमआयडीसीतही सतर्कता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST2021-05-11T04:32:04+5:302021-05-11T04:32:04+5:30
गेल्या अनेक वर्षांत अनेकदा कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आज सकाळी लागलेल्या आगीचे स्वरूप भीषण ...

कचरा डेपोतील आगीने उडाली सर्वांचीच धावपळ, एमआयडीसीतही सतर्कता
गेल्या अनेक वर्षांत अनेकदा कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आज सकाळी लागलेल्या आगीचे स्वरूप भीषण होते. ही आग दोन एकरावर लागली होती. सायंकाळपर्यंत आग धुमसतच होती. त्यामुळे धुराचे लोट पसरले होते. रखरखीत उन्हात आगीचे स्वरूप भीषण दिसत होते. आग आणि धुरामुळे डेपोच्या लगत एमआयडीसीतील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. डेपोशेजारून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनचालकांना धुराचा त्रास होत आहे. सारखी आग लागतेच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही तासांत ही आग विझविली गेली पाहिजे असताना नवापूर पालिकेकडे तेवढी यंत्रणा नाही का, असा सवाल केला जात आहे.
दिवसभरात अग्निशमन बंब डेपोवर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत होते. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता; परंतु आग आटोक्यात येत नव्हती. ही आग कशी लागली असा सवाल उपस्थित होत आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या धुरात जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले.