शांतता भंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:12 IST2019-04-17T12:12:17+5:302019-04-17T12:12:36+5:30
शहरातील घटना : पूर्ववैमनस्यातून हाणामारी

शांतता भंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
नंदुरबार : शहरातील ईमाम बादशाह दर्ग्याच्या पायथ्याशी आपसात भांडण करुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी तिघांविरोधता गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती़
शेख रफिक अब्दुल बनी, सुमेर शेख रफिक शेख दोघे रा़ बागवान गल्ली, शेख ईस्माईल शेख मुसा रा़ कुरेशी मोहल्ला हे तिघेही शुक्रवारी दुपारी एकमेकांसोबत भांडण करुन आरडाओरड करत असल्याचे नागरिकांना दिसून आले होते़ त्यांनी पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीस दाखल झाले होते़ पोलीसांसमोर तिघे भांडण करत असल्याने तिघांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रमेश मंगल सांळूंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ संैदाणे करत आहेत़