पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : मंदाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 13:25 IST2018-08-09T13:24:57+5:302018-08-09T13:25:04+5:30

FIR filed against nine people including husband | पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : मंदाणा

पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : मंदाणा


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुस:या महिलेशी लगअ करून पह्यिा पत्नीला मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह नऊ जणांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील जागृती रवींद्र भामरे या महिलेचा मंदाणा येथील रवींद्र मरतड भामरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर अर्थात गेल्या तीन महिन्यांपासून जागृती यांना सासरची मंडळी त्रास देत होती. रवींद्र भामरे याचे मंदाणा येथीलच महिलेशी प्रेमसंबध असून तिच्याशी लगअ करायचे आहे. त्यासाठी तुला फारकत देतो असे रवींद्र सांगत होता. त्याला तिचा विरोध होता. असे असतांनाही रवींद्र याने पूजा विठ्ठल टेमकर या महिलेशी विवाह केला. त्यासाठी नोटरीला खोटी माहिती दिली. पहिली पत्नी हयात असतांना दुसरीशी विवाह करून पहिल्या पत्नीचा छळ सुरू ठेवला.
जागृती भामरे यांनी शहादा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून रवींद्र भामरे, मरतड भामरे, नलुबाई भामरे, सुरेश सूर्यवंशी, मालुबाई सूर्यवंशी, पूजा विठ्ठल टेमकर रा.मंदाणा व प्रसाद विठ्ठल टेमकर, विशाल रत्नाकर को:हाळे, शुभम भगवान तुळेकर सर्व रा.आंबेगाव, पुणे यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बी.डी.शिंदे करीत आहे.

Web Title: FIR filed against nine people including husband