मारहाण करणाऱ्या चौघांना दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 11:45 IST2019-04-24T11:45:10+5:302019-04-24T11:45:31+5:30
धडगाव न्यायालय : खर्डी बुद्रुक येथे केली होती मारहाण

मारहाण करणाऱ्या चौघांना दंडाची शिक्षा
नंदुरबार : जागेच्या कुरापतीवरुन तिघांना मारहाण करणाºया चौघांना धडगाव न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे़ २०१५ मध्ये खर्डी बुद्रुक ता़ धडगाव येथे ही घटना घडली होती़
खर्डी बुद्रुक येथील लालश्या लखमी पावरा हे पशुपालनाचा व्यवसाय करतात़ २९ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री ९ वाजता त्यांच्याकडे काम करणारा गुराखी जोदा पावरा याच्यासोबत पोड्या दित्या पावरा, जोंजाड्या दित्या पावरा, गुंजाºया दित्या पावरा, बोल्या दित्या पावरा यांनी वाद घालून भांडण सुरु केले होते़ यावेळी लालश्या पावरा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, चौघांनी पावरा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती़ यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली़ चौघे आरोपी व लालश्या पावरा यांच्यात जागेवरुन वाद होता़ त्याची कुरापत काढून ही मारहाण झाली़ याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ याप्रकरणी धडगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला़ यात पोड्या दित्या पावरा, जोंजाड्या पावरा, गुंजाºया पावरा, बोल्या पावरा यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना १ वर्ष चांगल्या वर्तुणुकीच्या बाँडवर १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़ याप्रकरणी दोषारोपत्र सहायक पोलीस उपनिरीक्षक यांनी दाखल केले होते़ सरकार पक्षातर्फे अॅड़ आऱडी़बिºहाडे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सुरेश गावीत यांनी काम पाहिले़