सफाई कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक - राज्याध्यक्ष कंडारे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:06+5:302021-02-05T08:10:06+5:30
पालिका सफाई कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी नंदुरबारात भेट देऊन पत्रकार परिषद घेतली. शिवाय जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार यांच्या उपोषणस्थळीही ...

सफाई कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक - राज्याध्यक्ष कंडारे यांचा आरोप
पालिका सफाई कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी नंदुरबारात भेट देऊन पत्रकार परिषद घेतली. शिवाय जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार यांच्या उपोषणस्थळीही भेट दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, सफाई कामगारांच्या वारसांना पाच दिवसात नियुक्ती देण्याचे धोरण असताना पाच-सहा महिने त्यांना नियुक्ती दिली जात नाही. कालबद्ध वेतन श्रेणी पदोन्नतीचा लाभ दिला जात नाही. जुनी पेन्शन योजना सुरू असताना डीसीपीएस योजनेखाली शासनाचे कोणतेही आदेश नसताना अंशदान कापून या योजनेचा लाभापासून सफाई कामगारांना वंचित ठेवणे पेन्शन बंद करून सफाई कर्मचाऱ्यांच्या आर्थिक शैक्षणिक विकासावर याठिकाणी गदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सफाई कामगारांना गुलामाची वागणूक देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची शासकीय सुट्टी सफाई कामगारांना मिळत नाही तसेच शासकीय सुट्टीचा लाभ त्याला त्यांना देण्यात येत नाही. अशा एक ना अनेक गोष्टी या नंदुरबार नगर परिषद प्रशासनाच्या आहे. मागील चार वर्षापासून सफाई कर्मचाऱ्यांना कोणतेही गणवेश कामाचे साहित्य याठिकाणी देण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य उपाध्यक्ष धनराज पिवाल, अखिल भारतीय सफाई कामगार कल्याण संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद जावडेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश साळुंके उपस्थित होते.