फायनान्स कंपनीच्या वसुली अधिका:याची लूट करणा:या पाच जणांना 48 तासात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:09 IST2019-10-01T12:08:32+5:302019-10-01T12:09:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : फायनान्स कंपनीच्या वसुली अधिका:याकडून रोख रक्कम हिसकावून पळ काढणा:या 5 जणांना पोलीस पथकाने अवघ्या ...

Finance Company Recovery Officer: Robbery of: Five arrested in 48 hours | फायनान्स कंपनीच्या वसुली अधिका:याची लूट करणा:या पाच जणांना 48 तासात अटक

फायनान्स कंपनीच्या वसुली अधिका:याची लूट करणा:या पाच जणांना 48 तासात अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : फायनान्स कंपनीच्या वसुली अधिका:याकडून रोख रक्कम हिसकावून पळ काढणा:या 5 जणांना पोलीस पथकाने अवघ्या 48 तासात अटक करत मुद्देमाल हस्तगत केला़ शुक्रवारी कोठडा ता़ नंदुरबार शिवारात ही लुटीची घटना घडली होती़ 
शुक्रवारी सकाळी 10़30 वाजता फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी सागर राजेंद्र पाटील हे कोठडा येथून पैश्यांची वसुली करुन कोठली गावाकडे जात असताना कोठली गावाजवळ त्यांची दुचाकी अज्ञात तिघांनी लाथ मारुन खाली पाडली होती़ दरम्यान तिघांपैकी एकाने त्यांच्याजवळील 17 हजार 500 रुपये हिसकावून पळ काढला होता़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ याप्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांच्या मागदर्शनात दोन पथक तयार करुन संशयितांचा शोध घेण्यात येत होता़ दरम्यान जसवंत जहागू पाडवी रा़ करंजवे ता़ नवापुर, विनोद बिज्या गावीत रा़ रनाळे खुर्द ता़ नंदुरबार, शिवदास कुवरसिंग पाडवी रा़ रोझवा पुनवर्सन ता़ तळोदा, काशिनाथ केशव वळवी रा़ सोनपाडा ता़ नवापुर व सुरज रुपज्या वळवी रा़ ढेकवद यांनी लूट केल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ पथकाने पाचही संशयितांची धरपकड करत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व 5 हजार 500 रुपये जप्त करण्यात येऊन कारवाई करण्यात आली़ 
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली़ 
 

Web Title: Finance Company Recovery Officer: Robbery of: Five arrested in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.