अखेर ब्राह्मणपुरीत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:52 IST2020-08-26T12:52:22+5:302020-08-26T12:52:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : कोरोनापासून लांब राहिलेल्या शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला असून चार जण ...

Finally, the infiltration of corona in Brahmanpuri | अखेर ब्राह्मणपुरीत कोरोनाचा शिरकाव

अखेर ब्राह्मणपुरीत कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : कोरोनापासून लांब राहिलेल्या शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला असून चार जण बाधित झाले असून त्यातील एका वयोवृद्ध पुरुषाचा मृत्य झाला आहे. गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. चांदसैली येथेही एक रुग्ण आढळून आला आहे.
कोरोनापासून दूर राहिलेल्या ब्राह्मणपुरी गावात अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे. गावातील एका ९० वर्षीय वद्ध पुरुषाचा तर ५२ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल सुरत येथे खाजगी दवाखान्यात पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होता. त्यातील ब्राह्मणपुरी येथील ५५ वर्षीय महिलेचा तर ३३ वर्षीय पुरुषाचा व चांदसैली येथील ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली. या रुग्णांच्या संपर्कातील ब्राह्मणपुरी येथील सात तर चांदसैली गावातील पाच जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी शहादा येथे पाठवण्यात आले आहेत.
ब्राह्मणपुरी गावात आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, परिचारिका अलका मारनर, लताबाई बिरारे, आशा कार्यकर्ती सोनल राजपूत, मनीषा पाटील हे रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे सर्वेक्षण करीत आहते. तर चांदसैली गावात आरोग्य सेवक हिरालाल मराठे, आशा कार्यकर्ती उखीबाई शेमळे हे सर्वेक्षण करीत आहेत. ब्राह्मणपुरी गावात मंडळ अधिकारी निकिता नायक, तलाठी स्मिता पाटील, उपसरपंच माधवराव पाटील, ग्रामविकास अधिकारी गोपाळ पाटील, पोलीस पाटील रवींद्र पवार, ग्रामपंचायत कर्मचारी कैलास बिरारे, सांगा पावरा गावात उपाययोजना करीत असून संपर्कात आलेल्यांच्या घर व परिसरात फवारणी करण्यात आली. चांदसैली गावाचे सरपंच संजय पाडवी, ग्रामसेवक गोपाल गिरासे हे गावात उपाययोजना करीत आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असून नागरिक खुलेआम गर्दी करीत रस्त्यावर उभे राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील गावातील विनाकारण गर्दी करीत उभे असलेल्यांना स्थानिक नागरिक व कर्मचारी सांगण्यासाठी गेले तर भांडणही उद्भवते. ब्राह्मणपुरी बिटमध्ये १२ हून अधिक गावे जोडली असून या बिटात निदान एक किंवा दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तसाठी ठेवण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Finally, the infiltration of corona in Brahmanpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.