अखेर शेतकऱ्याने केळीवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:27 IST2020-04-30T12:25:02+5:302020-04-30T12:27:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या चार एकर क्षेत्रात व्यापाºयांकडून मागणी ...

Finally the farmer turned the plow on the banana | अखेर शेतकऱ्याने केळीवर फिरविला नांगर

अखेर शेतकऱ्याने केळीवर फिरविला नांगर

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या चार एकर क्षेत्रात व्यापाºयांकडून मागणी नसल्याने, चार एकर क्षेत्रातील उभ्या पिकाला तवा फिरवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. विशेषत: नाशवंत शेतमाल उत्पादक शेतकरी लॉकडाऊनमुळे अडचणीत आला आहे. केळी उत्पादक शेतकºयांनी पीक उभे करण्यासाठी लाखो रूपये खर्च करूनही काही केळी उत्पादक शेतकºयांना मातीमोल भावात विकावे लागले तर काही शेतकºयांवर तवा फिरवण्याची परिस्थिती निर्माण झाली.
तालुक्यातील केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. त्यांना तालुक्यातील केळी क्षेत्रही वाढले होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने निर्यात शक्य नाही. वाहतूक ठप्प असल्याने व्यापाºयांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. खरेदीदार नसल्याने शेतकºयांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
एक हजार झाडामागे ५० हजार ते लाख रूपये खर्च करावा लागतो. सध्या केळीची विक्री पूर्णपणे थांबली असल्यामुळे लागवडीचा खर्चदेखील निघत नाही. व्यापाºयांकडून मागणीदेखील बंद झाली आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. कोरोनामुळे नैसर्गिक संकट शेतकºयांच्या वाट्याला आले आहे. त्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी कोरोनाचा फटका बसलेल्या शेतकºयांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा होत आहे. सावकारी कर्ज काढून शेती गुंतवणूक केल्याने कर्ज फेडायचे कसे? कष्टाने पिकवूनही विक्री न झाल्यामुळे केलेला खर्च आणायचा कुठून? असे अनुत्तरित प्रश्न शेतकºयांच्या मनात आहेत. शहादा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे करून अनुदान लवकरात लवकर द्यावे अशी मागणी केळी उत्पादक शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

चार एकर क्षेत्रात केळी पिकाची लागवड केली होती. या वर्षीदेखील ती चांगली बहरली होती. मात्र कोरोनामुळे होत्याचे नव्हते झाले. संचारबंदी सुरू झाल्याने शेतातील एक डझन केळीचीदेखील विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे सरासरी साते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने केळीच्या क्षेत्रात तवा फिरवावा लागला..
-प्रकाश छगन पाटील, मोहिदा त.ह., केळी उत्पादक शेतकरी.

Web Title: Finally the farmer turned the plow on the banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.