शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अखेर जैविक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मोहिदा शिवारातील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली. येथे निर्माण होणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मोहिदा शिवारातील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली. येथे निर्माण होणारे बायोमेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी खासगी कंपनीशी करार करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान शुक्रवारी अचानक संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहिम राबविली गेल्याने येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांनी आश्चर्य व्यक्त केले.कोरोना विषाणू बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकृत करण्यासह सौम्य लक्षण असलेल्या बाधितांवर उपचारासाठी मोहिदा शिवारातील शासकीय वसतिगृहाच्या चार इमारतींमध्ये कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे १०० पेक्षा अधिक नागरिक येथे आहेत. या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांनी नाराजी व्यक्त केली होती तर वैद्यकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी असलेले पीपीई कीटची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी ते सार्वजनिक ठिकाणी फेकण्यात येत असल्याने संपूर्ण परिसरासह आजूबाजूच्या परिसरात कोरोनाविषाणू संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता.या कोविड सेंटरच्या दुरवस्थेबाबत ‘दैनिक लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून येथील रूग्णांच्या व्यथा मांडल्या व त्यावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शुक्रवारी सकाळपासूनच संपूर्ण परिसरात स्वच्छता कर्मचाºयांमार्फत साफसफाई करण्यात आली. ठिकठिकाणी साचलेले पाणी व घाणीचे ढिगारे उचलण्यात येऊन चारही इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे येथे निर्माण होणारे मेडिकल बायो वेस्टची शास्त्रीय पद्धतीने योग्य विल्हेवाट लावण्यासाठी धुळे येथील एका खासगी संस्थेशी करारनामा करण्यात आला आहे. दररोज हे मेडिकल बायो वेस्ट संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याचे बंधन या कंपनीवर घालण्यात आलेले आहे.परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची असली तरी बाधित रूग्ण उपचार घेत असलेल्या रूमची स्वच्छता करण्यासह तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ नये यासाठी रूग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निर्माण होणारा दैनंदिन कचरा एका ठिकाणी संकलित करून तो पिशवीत बांधून रूम बाहेर ठेवावा. त्याचप्रमाणे प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.