वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्याने आरोग्य केंद्रांतील रुग्णसेवेला आली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:17+5:302021-02-09T04:34:17+5:30
नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागात एकूण १ हजार ५६१ पदांची भरती करण्यात आली आहे. यांतर्गत एकूण १ हजार १५७ पदांवर ...

वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्याने आरोग्य केंद्रांतील रुग्णसेवेला आली गती
नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागात एकूण १ हजार ५६१ पदांची भरती करण्यात आली आहे. यांतर्गत एकूण १ हजार १५७ पदांवर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. एकूण ४०४ पदे सध्या रिक्त असली तरी याचा आरोग्य सेवेवर कोणताही ताण पडत नसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागात मात्र सहायक १५, आरोग्य सहायिका १७, औषध निर्माता अधिकारी ११, आरोग्य सेवक ८२ तर आरोग्य सेविकांची २५६ पदे रिक्त आहेत. गतिमान होणार आहे.
जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, औषध निर्माता, आरोग्य सेवक आणि सेविका आदी पदे मंजूर आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची १६४ पदे मंजूर असून ही सर्व भरण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून पात्र असलेल्या डाॅक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची २४९ पदे मंजूर करण्यात आली. यातील १८५ पदे भरली गेली आहेत. उर्वरित पदेही येत्या काळात भरली जातील, अशी माहिती देण्यात आली.
जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून ही वैद्यकीय अधिकारी व मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरली जात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी व उपकेंद्रांवर मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांच्याकडून सध्या सेवा देणे सुरू असून यातून जिल्ह्यातील आरोग्यसेवेची पाळमुळे मजबूत होत आहेत. दुर्गम भागापर्यंत आरोग्यसेवा पोहोचत आहे.
-डाॅ. एन.डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.