नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:39 IST2020-05-12T12:38:58+5:302020-05-12T12:39:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ सहा पोलीस ठाण्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ काही ठिकाणी मास्कविना फिरणारे तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अभाव दिसून आल्यानंतर कारवाई करण्यात आली़
शहादा
शहादा पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी मुनेश बापूजी जगदेव रा़ सिद्धार्थ नगर जळगाव हा शनिवारी मास्कविना आढळून आल्याने पोलींसानी कारवाई केली़ पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे़
सारंगखेडा
सारंगखेडा पोलीस ठाण्यांतर्गत वडाळी येथे रविवारी सायंकाळी अशोक दिलीप धनगर मास्कविना फिरत होता़ याठिकाणीच शनिवारी हारुन रज्जाक खाटीक व तौसिफ जमील शहा यांच्यावर मास्कविना फिरल्याने कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी तिघांविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद राठोड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे़
धडगाव
जुने धडगाव परिसरात मास्कविना फिरणाºया राजेंद्र विजय पावरा रा़ शेलकुवीचा नावडक्यापाडा ता़ धडगाव याच्यावर पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला़ पोलीस शिपाई विनोद पाटील यांनी फिर्याद दिली आहे़
दरम्यान शनिवारी धडगाव शहरात राजेंद्र रेहला वळवी व भूपेश गुलाबसिंग ठाकरे यांच्याविरोधात मास्क न लावता फिरल्याने गुन्हे दाखल आहेत़
नंदुरबार तालुका
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे गावाजवळ शनिवारी सुदाम वेडू कुमावत हा मास्कविना फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलीसांनी कारवाई केली़ रविवारी जुनमोहिदे गावात मास्कविना फिरणाºया रमेश युवराज घोडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली़ दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे़
नंदुरबार उपनगर
उपनगर पोलीस ठाण्यांतर्गत नंदुरबार शहरातील बाबा गरीबदास चौकात मास्कविना फिरणारा प्रतिक राजकुमार मंदाणा व विरु श्रीचंद दावणी या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली़ दोघे मास्कसोबत सोशल डिस्टन्सिंग करुन माल विक्री करत नसल्याचे दिसून आल्यानंतर दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले़
विसरवाडी
विसरवाडी ता़ नवापुर येथील साबेर सुलेमानभाई बंगलावाला भाणा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता मास्कविना फिरत होता़ त्याच्यावर कारवाई करण्यात आली़
शहरातील अहिंसा चौकातील सुंदरी ट्रेडर्सवर सोशल डिस्टन्सिंग नसल्याने अतुल युवराज अग्रवाल, कल्याणी पार्कमध्ये अविनाश मंगा पाटील व सी़बी़पेट्रोलपंपासमोर दुकानदार जयपालभाई नवतनदास बालाणी यांच्याविरोधात पोलीसांनी कारवाई केली़ सोशल डिस्टन्सिंग न ठेवता त्यांच्याकडून ग्राहकी सुरु होती़ उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नंदुबार शहर, तालुका आणि उपनगर पोलीस ठाणेंतर्गत दररोज सकाळी पथके दुकानांचा आढावा घेत आहेत़