मतदान करुन त्याचा फोटो व्हायरल करणाऱ्या अज्ञात मतदाराविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:48 IST2019-05-03T11:48:24+5:302019-05-03T11:48:59+5:30

प्रशासनाकडून दखल : अभिनव विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर घडला प्रकार

 Filing an FIR against the unidentified voter who violates his photo by voting | मतदान करुन त्याचा फोटो व्हायरल करणाऱ्या अज्ञात मतदाराविरोधात गुन्हा दाखल

मतदान करुन त्याचा फोटो व्हायरल करणाऱ्या अज्ञात मतदाराविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार : मतदान करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करणाºया अज्ञात मतदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ २९ रोजी लोकसभा निवडणूकींतर्गत मतदान करताना नंदुरबारात हा प्रकार घडला होता़
अभिनव विद्यालयाच्या बूथ क्रमांक ३/२९४ या मतदान केंद्रात २९ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मनाई असतानाही अज्ञात व्यक्तीने मोबाईल आत नेला होता़ दरम्यान संबधिताने मोबाईलवर मतदान करतानाचे छायाचित्र काढून ते सोशल मिडियात मतदान प्रक्रिया सुरु असतानाच व्हायरल केले होते़ यातून मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग झाला होता़ प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती़ याबाबत प्रकाश धोंडू चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात मतदाराविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण करत आहेत़

Web Title:  Filing an FIR against the unidentified voter who violates his photo by voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.