सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:10 IST2019-05-08T12:10:05+5:302019-05-08T12:10:29+5:30

किरकोळ वाद : शहरातील घटना

Filed in violation of public peace | सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नंदुरबार : शहरातील बागवान गल्लीत किरकोळ वादातून हाणामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दोघांविरोधात पोलीसांनी कार्यवाही केली़ सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला़
नासिर माजीद खान पठाण व महंमद समीर रऊफ खाटीक यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता़ या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले होते़ बागवान गल्लीतील पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकार सुरु होता़ यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़ दोघे पोलीसांसमोरच हाणामारी करत असल्याचे दिसून आल्यानंतर दोघांविरोधात कारवाई करण्यात आली़
याबाबत पोलीस नाईक कैलास सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नासीर खान पठाण व महंमद समीर खाटीक या दोघांविरोधात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक साळूंखे करत आहेत़

Web Title: Filed in violation of public peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.