चार वर्षापूर्वीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:13 IST2019-08-02T12:12:59+5:302019-08-02T12:13:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वडिलोपर्जीत शेती व घराच्या वाटणीच्या वादातून महिलेचा विनयभंग तर तिच्या पतीला बेदम मारहाणची घटना ...

चार वर्षापूर्वीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वडिलोपर्जीत शेती व घराच्या वाटणीच्या वादातून महिलेचा विनयभंग तर तिच्या पतीला बेदम मारहाणची घटना कवठळ, ता.शहादा येथे चार वर्षापूर्वी घटना. न्यायालयाच्या आदेशावरून चौघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2015 दरम्यान ही घटना घडली. कवठळ येथील महिलेस कापूस भरण्यासाठी गेलेल्या चौघांनी तिच्या घरात घुसून जाधव मदन चौधरी, मंगला जाधव चौधरी, कुणाल जाधव चौधरी रा.कवठळ व चंद्रकलाबेन प्रल्हाद पाटील, रा.वेळदा यांनी घरात घुसून मारहाण केली. तसेच दोघांनी महिलेचा विनयभंग केला.
याबाबत महिलेने न्यायलायात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीची चौकशी होऊन शहादा पोलिसात चौघांविरुद्ध 31 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस निरिक्षक पी.पी.थोरात करीत आहे.