शेतकऱ्याची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:33 IST2020-09-22T12:33:15+5:302020-09-22T12:33:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोंढावळ ता़ शहादा येथील शेतकºयाची केळी तोड करुन नेत त्याचे पैसे न देणाºया चोपडा ...

शेतकऱ्याची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोंढावळ ता़ शहादा येथील शेतकºयाची केळी तोड करुन नेत त्याचे पैसे न देणाºया चोपडा जि़ जळगाव येथील व्यापाºयाविरोधात पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे़ एप्रिल महिन्यात व्यापाºयाने केळीची खरेदी केली होती़
कोंढावळ येथील शेतकरी लक्ष्मण तुकाराम अहिरे यांनी लागवड केलेल्या केळीची एप्रिल महिन्यात तोड करण्यात आली होती़ ही केळी चोपडा येथील गुरूदास सोनवणे नामक व्यापाºयाने खरेदी केली होती़ व्यापाºयाने १३ टन ७६५ किलो माल खरेदी केला होता़ त्यापोटी शेतकºयाला ३६ हजार ७०९ रूपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ परंतु यानंतरही संबधित व्यापारी पैसे देत नसल्याने त्रस्त शेतकºयाने अर्ज देवून चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती़ या अर्जानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी पूर्ण करण्यात आली होती़ याबाबत लक्ष्मण तुकाराम अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केळी व्यापारी गुरूदास सोनवणे याच्याविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे करत आहेत़ सारंगखेडा पोलीसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून आणखी काही शेतकरी फसवले गेले आहेत किंवा कसे याचा तपास सुरू आहे़