वाण्याविहिर येथे तहसीलदारांसोबत हुज्जत घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:30 IST2020-07-11T12:30:18+5:302020-07-11T12:30:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथे अवैध रॉकेल साठा तपासणी करणाºया तहसीलदार व पुरवठा निरीक्षकासोबत हुज्जत ...

वाण्याविहिर येथे तहसीलदारांसोबत हुज्जत घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथे अवैध रॉकेल साठा तपासणी करणाºया तहसीलदार व पुरवठा निरीक्षकासोबत हुज्जत घालणाºया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बुधवारी तहसीलदारांनी दीड हजार लीटर रॉकेलसाठा जप्त केला होता़ यादरम्यान ही घटना घडली़
अक्कलकुव्याचे तहसीलदार सचिन म्हस्के यांनी बुधवारी दुपारी वाण्याविहिर येथील अशोक रतनचंद जैन याच्या केरोसिन गोडावूनवर धाड टाकून तपासणी केली होती़ यादरम्यान गावातील दिलीप वैजनाथ परदेशी याने गोडावूनमध्ये येऊन रॉकेलची मागणी केली होती़ यावेळी त्याने मास्क न वापरता पुरवठा निरीक्षक सुरेश दौलत चौधरी यांच्या अंगावर धावून जात सुरू असलेल्या कारवाईत अडथळा आणला होता़ यातच स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यास सुरूवात केली़ यावेळी तहसीलदार सचिन म्हस्के यांनी परदेशी यास अटकाव केला असता, त्यांना अरेरावी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता़ याप्रकारानंतर पुरवठा अधिकारी सुरेश चौधरी हे कामानिमित्त नंदुरबार येथे गेले असल्याने गुरूवारी सायंकाळी उशिरा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ चौधरी यांच्या फिर्यादीवरुन संशयित दिलीप परदेशी याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा, साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़