विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:39 IST2020-12-14T12:39:30+5:302020-12-14T12:39:37+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  विनामास्क मोटारसायकल चालवत असल्याचे कारण सांगून शहादा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व वाहतूक पोलिसांनी अमानुषपणे ...

File a case against the police for beating the student | विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करा

विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करा

 लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  विनामास्क मोटारसायकल चालवत असल्याचे कारण सांगून शहादा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व वाहतूक पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करत दुचाकीचालकास जखमी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे अंतिम वर्ष कला शाखेचा शेवटचा पेपर देता आला नसल्याने दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अन्यथा १५ डिसेंबरला प्रांताधिकारी कार्यालयावर संपूर्ण कुटुंब आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील संजय पिंपळे यांनी दिला आहे. 
१९ नोव्हेंबर रोजी शहादा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विकास व त्याचे वडील संजय पिंपळे हे मोटारसायकलवर आले असता  वाहतूक पोलीस सचिन पाटील यांनी त्यांना थांबवले. तुम्ही चेहऱ्यावर मास्क लावला नसून, तुमच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहतूक  पोलीस सचिन पाटील व उपनिरीक्षक कैलास माळी यांनी विकास पिंपळे यास पोलीस ठाण्यात नेऊन अमानुषपणे मारहाण केली. यात विकासच्या कानावर जोरदार फटके लागल्याने त्याच्या कानाला गंभीर दुखापत झालेली आहे. 
या मारहाणीत विकासाच्या कानाचा पडदा फाटला आहे. तसेच विकासच्या मोबाइलमधील डेटा डिलीट करून पोलिसांनी दोघांकडून ४०० रुपये दंडाची आकारणी केल्यानंतर दोघांना सोडून दिले. यावेळी विकासचा तृतीय वर्ष कला शाखेचा अंतिम पेपर असल्याने तो ऑनलाइन पेपर देणार होता. त्याचे हॉल तिकीट व ऑनलाइन रजिस्ट्रेशन मोबाइलमध्ये होते. मात्र पोलिसांनी सर्व डेटा डिलीट केल्याने तो पेपर देण्यापासून वंचित राहिला. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. 
वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन योग्य ती कारवाई झाली नसल्याने दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नसल्याने १५ डिसेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संजय पिंपळे, जखमी विकास पिंपळे व त्याची आई वंदना पिंपळे असे संपूर्ण पिंपळे कुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे कुटुंबाने दिला          आहे.

Web Title: File a case against the police for beating the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.