नंदुरबारात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 13:44 IST2020-05-07T13:43:56+5:302020-05-07T13:44:04+5:30

नंदुरबार : किरकोळ कारणावरून नंददुरबारातील कुरेशी मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत परस्पर विरोधी गुन्हे दंगलीचा तसेच शासन आदेशाचे ...

Fighting in Nandurbar | नंदुरबारात हाणामारी

नंदुरबारात हाणामारी

नंदुरबार : किरकोळ कारणावरून नंददुरबारातील कुरेशी मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत परस्पर विरोधी गुन्हे दंगलीचा तसेच शासन आदेशाचे उल्लंघन केलल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील चार जणांना अटक केली आहे.
मारहाणीत दोन्ही गटातर्फे चाकू, लाठ्या, काठ्यांचा वापर करण्यात आला. याबाबत नायबान जाहीरखान कुरेशी यांच्या फिर्यादीवरून शेख इस्तीयास अब्दुल रज्जाक, शेख रोनक मुस्ताक, शेख अखलाक शेख मुस्ताक, शेख रशिद अब्दुल रजाक, शेख शफी शेख इसाद, शेख खलिल शेख इसाक, शेख मोहम्मद शेख रफा व इतर असे एकुण १४ जणांवर गुन्हा दाखल झाला. दुसरी फिर्याद कसाई अब्दुल रशिद अब्दुल रज्जाक यांच्या फिर्यादीवरून फारूखखान जहीर खान कुरेशी उर्फ पप्पू कुरेशी, नायबखान जहीरखान कुरेशी, फिरोजखान कुरेशी यांच्यासह एकुण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय याच घटनेतील काहीजण पोलीस ठाण्याच्या आवारात देखील हाणामारी करतांना दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध देखील तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकुण ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातर्फे देण्यात आली.

Web Title: Fighting in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.