शहादा येथे किरकोळ कारणातून हाणामारी, दुचाकी जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:37+5:302021-02-05T08:09:37+5:30
शहादा : दुचाकी वाहन चालविण्याचे सांगितल्याचा राग येेऊन दोन गटात मारहाण झाली. यात एका गटातर्फे दुचाकी जाळण्यात आली आहे. ...

शहादा येथे किरकोळ कारणातून हाणामारी, दुचाकी जाळली
शहादा : दुचाकी वाहन चालविण्याचे सांगितल्याचा राग येेऊन दोन गटात मारहाण झाली. यात एका गटातर्फे दुचाकी जाळण्यात आली आहे. याबाबत तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शहादा येथील मिशन बंगला परिसरात ही घटना शनिवारी घडली.
मिशन बंगल्याच्या पाठीमागील भागात काही युवक क्रिकेट खेळत होते. त्यावेळी तेथून जात असलेल्या युवकाला दुचाकी हळू चालविण्याचे राहुल गिरासे, रा.लोणखेडा याने सांगितले. त्याचा राग येऊन दोन गटात हाणामारी झाली व दुचाकी जाळण्यात आली. याबाबत पहिली फिर्याद राहुल गिरासे याने दिली. त्यावरून अब्दुल वाहिद तेली, वाहीद तेली व एक महिला यांच्याविरुद्ध तर दुसरऱ्या फिर्यादीवरून भूषण माळी, राहुल गिरासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल तेली हा जखमी झाला आहे.
पोलिसांनी दोन्ही गटातील तीन जणांना अटक केली आहे. वेळीच पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, सहायक निरीक्षक नीलेश वाघ यांनी भेट दिली.