नमाज पठण करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी, पाचजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:45+5:302021-05-10T04:30:45+5:30
नंदुरबार : मशिदीसमोर गर्दी करण्याचा व नमाज पठण करण्याच्या कारणातून नंदुरबारातील चिरागअली परिसरात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शनिवारी ...

नमाज पठण करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी, पाचजण जखमी
नंदुरबार : मशिदीसमोर गर्दी करण्याचा व नमाज पठण करण्याच्या कारणातून नंदुरबारातील चिरागअली परिसरात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शनिवारी (दि. ८) घडली. मारहाणीत पाचजण जखमी झाले असून, या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे.
जखमींमध्ये शेख आबिद शेख जैनोदिन, शेख असिफ शेख जैनोदिन, सलीम शेख गुलाम रसूल, साहिद शेख सलीम शेख व फरिद शेख गुलाम रसूल (सर्व रा. नंदुरबार) यांचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनुसार, चिराग गल्लीतील मोहम्मद आबिद शेख यांनी मशिदीसमोर गर्दी करू नका, केवळ पाच जणांना परवानगी आहे, असे सांगितले. त्याचा राग येऊन जमावाने त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके, हॉकी स्टिकने मारहाण केली. मोहम्मद आबिद शेख यांच्या फिर्यादीवरून फरीद शेख गुलाम रसूल, फिरोज शेख गुलाम रसूल, रशीद शेख गुलाम रसूल, रहीम शेख गुलाम रसूल, अनिस शेख गुलाम रसूल, इम्रान शेख गुलाम रसूल, निहाल शेख मेहमूद मिस्तरी, मेहमूद गुलाम हुसेन, फहिम अब्दुल कादीर शेख, शाहिद शेख सलीम, सलीम शेख गुलाम रसूल, सर्व रा. नंदुरबार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद फरीद शेख गुलाम रसूल यांनी दिली. मशीद ट्रस्टचे घरभाडे दिले नाही व मशिदीत नमाज पठण करण्याच्या कारणातून जमावाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सैय्यद सेहबाज सैय्यद मोतेवरअली, सैय्यद मोतेबर अली, शेख आबिद शेख जैनोदिन, शेख आकिब शेख जैनोद्दीन, शेख आरीफ शेख जैनोदिन, अनिस इस्माईल मेमन, शेख आतीफ जैनोदिन, शेख आसिफ जैनोदिन व जाविदखान इम्रानखान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी फरिद शेख गुलाम रसूल व सलीम शेख गुलाम रसूल यांना अटक केली आहे. तपास फौजदार पी. पी. सोनवणे करीत आहे.