आपसात हाणामारी करणा:या महिलांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:26 IST2019-06-18T21:24:50+5:302019-06-18T21:26:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ वादातून आपसात हाणामारी करणा:या महिलांविरोधात पोलीसात सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात ...

आपसात हाणामारी करणा:या महिलांविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ वादातून आपसात हाणामारी करणा:या महिलांविरोधात पोलीसात सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सोमवारी दुपारी 12 वाजता नंदुरबार शहरात हा प्रकार घडला़
शहरातील सिद्धार्थ नगर भागात सिंधुबाई खिरण गुलाले, मंगलाबाई पवार, शोभाबाई वानखेडे, संगिताबाई मोहन इंदवे, मिनाबाई अशोक पेंढारकर, लताबाई सुधाकर पगारे, अक्काबाई दगा बेडसे यांच्यासह उत्तम हिरामण पेंढाकर हे आपसात भांडत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती़ यानुसार पोलीसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता, महिला आपसात भांडून सार्वजनिक शांततेचा भंग करत होत्या़ समजावण्याचा प्रयत्न करुनही त्यांनी ऐकून घेतले नाही़ पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र मोहने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सात महिला आणि 1 पुरुषाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत़