मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:57 IST2020-02-10T12:56:51+5:302020-02-10T12:57:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील शेल्टी येथील गावठाण शिवारात कपाशीच्या शेतात रविवारी सकाळी दीड ते दोन वर्ष वय ...

The female was found dead in the carcass | मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला

मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील शेल्टी येथील गावठाण शिवारात कपाशीच्या शेतात रविवारी सकाळी दीड ते दोन वर्ष वय असलेली बिबट जातीची मादी गावकऱ्यांना मृतावस्थेत आढळली. शेल्टीच्या पोलीस पाटलांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनक्षेत्रपाल अनिल पवार आपल्या टीमसह दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून वनविभागाचा काष्ट आगारात शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेल्टी येथे तापी नदीच्या काठावरील गावठाण शिवारात काळा हनुमान मंदिरानजीक कपाशीच्या शेतात बिबट जातीचा वन्यप्राणी हालचाल न करता जमिनीवर पडलेला दिसला. प्रत्यक्षदर्शी प्रथम घाबरले होते. पोलीस पाटील चंद्रकांत शिवाजी पाटील यांनी शहादा वनविभागाचे वनक्षेत्रपाल अनिल पवार यांना घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली. पवार हे तात्काळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी भेट दिली असता संबंधित बिबट जातीची मादी ही मृत अवस्थेत आढळल्याने शासकीय नियमानुसार सोपस्कार पार पाडण्यासाठी शहादा येथील टिंबर डेपोत आणण्यात आले. मृत मादी बिबटचे अंदाजित वय दीड ते दोन वर्ष असावे व वजन साधारणत: ६० किलो असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मृत बिबट जातीच्या मादीचे शवविच्छेदन धडगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.जयेश पाठक यांनी केले. शरीरातील काही भाग न्यायवैद्यक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या वेळी वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनपाल एस.एस. इंदवे, एस.एस. देसले, व्ही.जे. तेली, डी.डी. पाटील, एस.जी. मुकाडे, पी.आर. वाघ, ए.एन. तावडे, जे.बी. गिरासे, ए.बी. न्याहाळदे, विनायक पाटील, सागर निकुंभे आदी उपस्थित होते
दरम्यान, मृत बिबट जातीच्या मादीवर येथील काष्ट आगारातील टिंबर डेपोत शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी अमृतकर आदींसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तिचा मृत्यू हा उपाशी असल्याकारणाने झाला असावा असा कयास पशुवैद्यकीय अधिकाºयांनी लावला.

Web Title: The female was found dead in the carcass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.