दुष्काळी गावांवर अन्यायाची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:19 AM2017-09-20T11:19:50+5:302017-09-20T11:19:50+5:30

सरसकट जाहीर केल्याने नाराजी : शहादा तालुका व नंदुरबारचा पुर्व भाग दुष्काळी

 The feeling of injustice on drought-hit villages | दुष्काळी गावांवर अन्यायाची भावना

दुष्काळी गावांवर अन्यायाची भावना

Next
ठळक मुद्दे आणेवारीसाठी समितीचे गठण व्हावे.. पीक आणेवारी ठरविण्याबाबत महसूल व कृषी विभाग एकमेकांवर चालढकल करत असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येतात. वास्तविक शासन निर्णयानुसार पैसेवारी ठरविण्याची आदर्श पद्धत आहे. त्यासाठी गाव स्तरावर एक समिती असते. समितीत तलाठी, ग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नजर आणेवारी जिल्हाभरात सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक लागू केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तसेच संपुर्ण शहादा तालुक्यातील पीक परिस्थिती अतिशय खराब आहे. शहादा तालुक्यात तर सरासरीचा 30 टक्के पाऊस कमी आहे. असे सर्व असतांना केवळ अंदाजाने आणेवारी जाहीर करून शेतक:यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतक:यांमधून उमटत आहेत.   
जिल्हा प्रशासनाने नुकतीच पीक नजर आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सर्वच महसूल गावांमधील आणेवारी ही 50 पैशांपेक्षा अधीक असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे एकही गाव दुष्काळ किंवा अवर्षणग्रस्त राहणार नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. वास्तविक नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यातील बहुतांश भागात पीक परिस्थिती अत्यंत खराब असतांना ही आणेवारी कुठल्या आधारावर तयार करण्यात आली असा प्रश्न निर्माण होत आहे.
दुबार पेरणी
शहादा तालुक्यातील अनेक भागात तसेच नंदुरबार व नवापूर तालुक्यातील ब:याच भागात पेरणीनंतर पावसाने ताण दिल्यावर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतक:यांवर आले होते. त्या संकटातून शेतकरी थोडेफार सावरले होते. परंतु यंदा वरुणराजाने शहादा तालुक्यावर अवकृपा कायम ठेवल्याचे चित्र आहेच. त्यामुळे अनेक भागातील पीक परिस्थिती जेमतेम असतांना व यंदा उत्पादकता कमी येणार हे स्पष्ट असतांना कुठलाही सव्र्हे न करता सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक आणेवारी जाहीर करून प्रशासनाने काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग तर नेहमीच अवर्षणप्रवण राहीला आहे. यंदा देखील या भागात कमी पजर्न्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.
शहादा : 30 टक्के तूट
शहादा तालुक्यात पावसाची यंदा 30 टक्के तूट आहे. एकुण सरासरीचा केवळ 68 टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. आता पावसाळा संपण्यास केवळ 15 दिवस शिल्लक असल्यामुळे सरासरी भरून  काढण्याबाबत साशंकता असल्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शहादा तालुक्यात पावसाची तूट राहणार आहे. शहादा तालुक्याचे एकुण सरासरी पजर्न्यमान 686.10 मिलीमिटर इतके आहे. आतार्पयत अर्थात पावसाळ्याच्या साडेतीन महिन्यात केवळ 466 मि.मी.पाऊस पडलेला आहे. गेल्यावर्षी याच तारखेर्पयत 522 मि.मी.पाऊस पडला होता.
अंतिम आणेवारीत विचार व्हावा
अंतिम पीक आणेवारी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर करण्यात येते. त्यावेळी तरी किमान शास्त्रीय आणि प्रचलित पद्धतीने आणेवारी काढून ती जाहीर करावी व शेतक:यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी होत आहे. याबाबत स्वत: जिल्हाधिका:यांनीच दखल घ्यावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 
गेल्यावर्षी 150 गावे
गेल्यावर्षी देखील वरूणराजाने संपुर्ण शहादा तालुका आणि नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागावर अवकृपा केली होती. त्यामुळे शहादा तालुक्यातील 135 गावे आणि नंदुरबार तालुक्यातील 15 गावांमधील आणेवारी 50 पैशांच्या आत लागू झाली होती. परिणामी ही गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली होती. त्याचा लाभ शेतक:यांना मिळाला होता. यावर्षी देखील याच भागावर वरुणराजाने अवकृपा केलेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणे निर्णय घ्यावा अशी मागणी शेतक:यांमधून व्यक्त होत आहे.

Web Title:  The feeling of injustice on drought-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.