कोरोना लढाईत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टी देण्याची आरोग्य कर्मचारी महासंघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:34+5:302021-05-21T04:31:34+5:30

कोविडची साथ आटोक्यात आणण्यासाठी जिवाची बाजी लावून अहोरात्र काम करणाऱ्या प्रसंगी स्वतःचे व कुटुंबातील व्यक्तींचे हौतात्म्य पत्करूनही जनसेवा हीच ...

The Federation of Health Workers demands government leave for health workers working in the Corona War | कोरोना लढाईत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टी देण्याची आरोग्य कर्मचारी महासंघाची मागणी

कोरोना लढाईत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टी देण्याची आरोग्य कर्मचारी महासंघाची मागणी

कोविडची साथ आटोक्यात आणण्यासाठी जिवाची बाजी लावून अहोरात्र काम करणाऱ्या प्रसंगी स्वतःचे व कुटुंबातील व्यक्तींचे हौतात्म्य पत्करूनही जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या पंधरा महिन्यांपासून साप्ताहिक व इतर शासकीय सुट्ट्या मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना रविवारची साप्ताहिक सुट्टी व इतर शासकीय सुट्ट्या देण्यात याव्यात. सुट्टीच्या दिवशी काम केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना पर्यायी बदली सुट्टी देण्यात यावी. जनतेला सर्वोच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहणे, तो ताणतणावरहित असणे आवश्यक आहे. सुट्टी ही कायद्याला व नियमाला धरून असली तरी मानवतेच्या दृष्टिकोनातूनही कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणे आवश्यक आहे. तसेच नवापूर तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर स्वॅब टेस्ट व रॅपिड अँटिजन टेस्टच्या टारगेटची सक्ती केली जात आहे. सदरची सक्ती नसावी असे निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: The Federation of Health Workers demands government leave for health workers working in the Corona War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.