Fearing a weapon, the motorcycle fled | शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल पळवली
शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल पळवली


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : युवकाला शस्त्राचा धाक दाखवून दुचाकी पळवून नेल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी साडेचार वाजता घडला़ जुने स्लॉटर हाऊस परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घोडापीर मोहल्ल्यातील शेख मुजाहिद शेख मोहियोद्दीन हा १५ वर्षीय युवक मोटारसायकलने जुने स्लॉटर हाऊस जवळून जात असताना त्याला राजेश परशुराम ठाकरे रा़ चिंचपाडा भिलाटी याने थांबवले होते़ राजेश ठाकरे याने युवकाला धक्का देत दुचाकीवरुन खाली पाडले़ दरम्यान त्याला विरोध केला असता, संशयित राजेश याने हातातील धारदार कटरने जखमी करण्याची धमकी देत मारहाण करुन १० हजार रुपये किमतीच्या दुचाकीसह पळ काढला़
याप्रकरणी शेख अनिसोद्दीन शेख रहिमोद्दीन यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राजेश ठाकरे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत़

Web Title: Fearing a weapon, the motorcycle fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.