बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे पिकांच्या नुकसानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 12:03 PM2020-06-07T12:03:28+5:302020-06-07T12:03:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर शिवारातील सुखनाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या केटीवेअर बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने पुराचे ...

Fear of crop damage due to incomplete dam work | बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे पिकांच्या नुकसानीची भीती

बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे पिकांच्या नुकसानीची भीती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर शिवारातील सुखनाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या केटीवेअर बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने पुराचे पाणी शेतात शिरुन नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. बंधाºयाच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आल्याने मातीचा भराव झाला असून संबंधित विभागाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातून वाहणारी सुखनाई नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीवर नादुरुस्त कोल्हापुरी बंधारा असल्याने पावसाचे पाणी वाहूून जात होते. त्यामुळे या पाण्याचा शेतकºयांना उपयोग होत नाही. या अनुषंगाने शासनाकडून सुखनाई नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंधारा बांधकामासाठी नदीत मोठा खड्डाही खोदण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामे बंद झाल्याने हे कामही बंद पडले. परंतु सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणून बांधकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या कामालाही सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र हे काम बंदच आहे.
बंधाºयासाठी खोदकामातून निघालेली माती नदीत पडून असल्याने पुराचे पाणी शेतात जाऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. या बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे यासाठी शेतकºयांनी वारंवार संबंधित ठेकेदार व अधिकाºयांना सांगितले. परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरुन होणाºया नुकसानीला जबाबदार कोण राहील? असा प्रश्नही शेतकºयांकडून उपस्थित होत आहे. या बंधाºयाच्या बांधकामानजीक अंबालाल पाटील, काशीनाथ पाटील, छायाबाई पाटील, सुरेखाबाई पाटील, दिनेश पाटील, रमेश पाटील, सरलाबाई पाटील, उमेश पाटील, प्रल्हाद पाटील, रेखाबाई पाटील यांच्या मालकीचे शेत असून पुराचे पाणी शेतात शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबधित विभागाच्या अधिकाºयांनी या समस्येकडे लक्ष घालून उपाययोजना करून शेतपिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी या बंधाºयाच्या कामालगत शेती असलेल्या शेतकºयांकडून होत आहे.


सुखनाई नदीत सुरू असलेले बंधाऱ्याचे काम गेल्या पाच महिन्यापासून बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाला असून नदीला पूर आला तर मातीच्या ढीगामुळे पाणी शेतात वळेल व पिकांचे नुकसान होऊ शकते. संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर बंधाऱ्यांचे काम सुरू करावे.
-अंबालाल काशीनाथ पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी (भागापूर शिवार).

Web Title: Fear of crop damage due to incomplete dam work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.