आईची बाजू घेत नेहमी मध्यस्थी करणाऱ्या पुत्राचा पित्याने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:40 IST2019-12-20T11:34:49+5:302019-12-20T11:40:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रापापूर येथे बापाने झोपेत असलेल्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ...

आईची बाजू घेत नेहमी मध्यस्थी करणाऱ्या पुत्राचा पित्याने केला खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रापापूर येथे बापाने झोपेत असलेल्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली होती़ याप्रकरणी बुधवारी रात्री तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
संदीप लक्ष्मण वसावे (३५) असे मयत युवकाचे नाव आहे़ रापापूर येथील रहिवासी असलेल्या संदीप वसावे याचे वडील लक्ष्मण दोहºया वसावे हे वेळोवेळी किरकोळ वाद उकरुन काढत पत्नीसोबत भांडत होता़ यात संदीप हा मध्यस्थी करुन आईची बाजू घेत वडील लक्ष्ण वसावे यास आवर घालत होता़ या गोष्टीचा राग मनात ठेवत लक्ष्मण वसावे याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या संदीप याच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून जखमी केली़ दरम्यान त्याच्या डोक्यासह छाती व पोटावर पाईप मारुन गंभीर जखमी केले़ रक्तस्त्राव झाल्याने संदीप याला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते़ परंतू जखम गंभीर असल्याने त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता़
याबाबत दिलीप वसावे रा़ रापापूर याच्या फिर्यादीवरुन संशयित लक्ष्मण वसावे याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन गुरुवारी पहाटे पाच वाजता अटक करण्यात आली़ मयत संदीप याची पत्नी नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होती़ ती गावी आल्यानंतर तळोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला़