शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सासरा, गर्भवती मुलगी व जावई अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:02 PM

n  लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  सासरे, जावई व मुलीचा भिषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना विसरवाडीनजीक घडली. या अपघातात ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी :  सासरे, जावई व मुलीचा भिषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना विसरवाडीनजीक घडली. या अपघातात दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मयत महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनातून ते स्पष्ट झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दिवाळीनिमित्त गोरख सोनू सरक (५६), प्रफुल सुरेश वाघमोडे (३५) व मनीषा प्रफुल वाघमोडे (२४ ) सर्व राहणार महिर ता. साक्री जि धुळे हे जागीच ठार तर निकिता गोरख सरक (१५) ही गंभीर जखमी झाली.साक्री तालुक्यातील महिर येथील रहिवासी गोरख सोनू सरक यांची मुलगी व जावई हे राजकोट येथे नोकरी करतात. मुलगी व जावई हे राजकोट येथून दिवाळीनिमित्त घरी येण्यासाठी निघाले. त्यात राजकोटहून सुरतपर्यंत एका खाजगी वाहनाने आले. त्यांना घेण्यासाठी गोरख सोनू सरक व त्यांची लहान मुलगी निकिता गोरख सरक हे सुरत येथे कारने (क्रमांक एमएच -१८ डब्ल्यू २३९०) सुरत येथून त्यांना घेऊन पुन्हा सुरत येथून महिर या गावी जाण्यासाठी निघाले.कार धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खामचौदर शिवारातील हजरत सय्यद अली रसूल बाबा यांच्या दर्ग्या जवळील पुलाजवळून जात असताना धुळ्याकडून सुरतकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एमएच १८- डब्ल्यू २३९०) कारला धडक दिली. या अपघातात कार पुलावरून सरळ ४० फूट खाली कोसळली. अपघातात कारमधील गोरख सोनू सरक, प्रफुल सुरेश वाघमोडे, व मनीषा प्रफुल वाघमोडे हे जागीच ठार झाले. तर निकिता गोरख सरक ही गंभीर जखमी झाली.हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व महामार्ग पोलिस मदत केंद्रावरील पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांनी मयत व जखमीला विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीवर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी व परिचारिका वर्ग यांनी उपचार केले व पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप पोलीस अधीक्षक सचिन हिरे, महामार्ग पोलीस मदत केंद्राची सहायक पोलीस निरीक्षक आर.एम. काझी, विसरवाडी पोलीस ठाण्याची सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक भूषण बैसाने व पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिली.अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला. धुळे सुरत महामार्गावर वारंवार अपघात होत असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. २१ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी याच पुलावरून एक खासगी लक्झरी बस कोसळून अपघात झाला होता. या अपघातात पाच जण जागीच ठार तर ३५ जण जखमी झाले होते. पुन्हा आज २२ दिवसांनी त्या ठिकाणी त्याच पुलावरून हा अपघात झालेला आहे. या अपघातास महामार्ग अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, असा संताप व्यक्त केला जात आहे.