पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या पतीचा सासरच्यांनी केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:26 IST2019-09-07T12:26:13+5:302019-09-07T12:26:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरी असलेल्या पत्नीची विनवणी करत तिला घरी घेऊन जाण्यासाठी सासुरवाडीला आलेल्या पतीचा सासू-सासरे आणि ...

पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या पतीचा सासरच्यांनी केला खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माहेरी असलेल्या पत्नीची विनवणी करत तिला घरी घेऊन जाण्यासाठी सासुरवाडीला आलेल्या पतीचा सासू-सासरे आणि पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला़ याप्रकरणी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होत़े
2 ते 4 सप्टेंबर दरम्यान हा खुनाचा गुन्हा घडला होता़ सुरेश गुलाबसिंग वळवी (28) असे मयत पतीचे नाव असून तो गढीकोठडा ता़ तळोदा येथील रहिवासी आह़े घटना उघडकीस आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली होती़
घटनेतील मयत सुरेश वळवी याचा विवाह चिनोदा येथील वंदनाबाई हिच्यासोबत झाला होता़ विवाहानंतर वंदनाबाई ही माहेरीच राहत असल्याने सुरेश वळवी हा तिला गढीकोठडा येथील सासरी घेऊन जाण्यासाठी येत होता़ यातून त्यांच्यात वादावादी होत होती़ 2 सप्टेंबर रोजी सुरेश हा वंदनाबाई हीला भेटण्यासाठी चिनोदा येथे गेला होता़ याठिकाणी त्याचा सासरे जंग्या मो:या नाईक याच्यासोबत वाद झाला होता़ यातून सुरेश यास सासरा जंग्या नाईक, सासू शांताबाई नाई आणि पत्नी वंदनाबाई यांनी मारहाण केली होती़ मारहाणीत काठीने डोक्यावर, गळ्याजवळ व डाव्या बरगडय़ांवर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला़ घटनेनंतर मयत सुरेश वळवी याच्या कुटूंबियांनी गढीकोठडा येथे त्याचा अंत्यविधी पूर्ण करत तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ याबाबत मयताचे वडील गुलाबसिंग वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जंग्या नाईक, शांताबाई नाईक व वंदनाबाई वळवी सर्व रा़ चिनोदा या तिघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे करत आहेत़
गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तिघा संशयितांना तळोदा पोलीस ठाण्यात आणून पोलीस अधिका:यांनी त्यांची चौकशी केली होती़ मयत सुरेश व वंदनाबाई यांना एक मुलगा असून या घटनेमुळे तळोदा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े