दारूसाठी पैसे न दिल्याने बापाचा मुलावर कटरने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:57 IST2020-08-06T12:57:15+5:302020-08-06T12:57:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून बापाने मुलावर कटरने वार करुन जखमी केल्याची सोमवारी ...

दारूसाठी पैसे न दिल्याने बापाचा मुलावर कटरने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून बापाने मुलावर कटरने वार करुन जखमी केल्याची सोमवारी तळोदा शहरात घडली होती़ याप्रकरणी बुधवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
शहरातील मेन रोड वरील विनय ईश्वरलाल सोनार याने सोमवारी रात्री पत्नी कडून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली होती़ पत्नी व मुलाने पैसे न दिल्याने त्याने रागाच्या भरात खिशातून कटर काढून पत्नीव धावून गेला़ यावेळी मुलगा रितीक हा मध्यस्थी करुन समजावत असताना विनय सोनार याने मुलगा रितीक याच्या छातीवर कटर मारुन दुखापत करुन शिवीगाळ करण्यासह जीवे ठार मारण्याची धमकी दिली़
याबाबत सुवर्णा विनय सोनार यांनी बुधवारी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित विनय सोनार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करत आहेत़ या प्रकाराची माहिती शहरात मिळाल्यानंतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत होती़