सुसरी प्रकल्पातून पाणी न सोडल्यास उपोषण

By Admin | Updated: February 27, 2017 00:51 IST2017-02-27T00:51:10+5:302017-02-27T00:51:10+5:30

शहादा : सुसरी प्रकल्पातून शेतकºयांच्या शेतात पाणी मिळावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Fasting if there is no water from the whole project | सुसरी प्रकल्पातून पाणी न सोडल्यास उपोषण

सुसरी प्रकल्पातून पाणी न सोडल्यास उपोषण

शहादा :  सुसरी प्रकल्पातून शेतकºयांच्या शेतात पाणी मिळावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष वसंत पाटील व पदाधिकाºयांनी तहसीलदार नितीन गवळी यांना लेखी निवेदनाद्वारे बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. सुसरी धरणाच्या पाटचाºयांची कामे अपूर्ण असल्याने सुसरीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहोचू शकलेले नाही. याबाबत संबंधित विभागाकडून चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. या मागणीनुसार तहसीलदारांनी उपविभागीय अभियंता शिवण मध्यम प्रकल्प यांना २० फेब्रुवारी २०१७ पर्यंत माहिती देण्याचे आदेश केले होते. मात्र,  २० फेब्रुवारी रोजी तहसीलदारांच्या आदेशालाही न जुमानता संबंधित अधिकारी माहिती देण्यासाठी उपस्थित न झाल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. सुसरी प्रकल्पाच्या पाटचारीबाबत अधिकाºयांनी माहिती न दिल्याने पाटचारीचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
     (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fasting if there is no water from the whole project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.