नगरपंचायतीतून बाहेर पडण्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:53 IST2020-10-22T12:53:05+5:302020-10-22T12:53:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : नगरपंचायतींतर्गत येणार्या रोषमाळ बुद्रुक ग्रामस्थांना सुविधा मिळत नसल्याने त्यांनी नगरपंचायत हद्दीतून वगळण्यात यावे अशी ...

नगरपंचायतीतून बाहेर पडण्यासाठी उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : नगरपंचायतींतर्गत येणार्या रोषमाळ बुद्रुक ग्रामस्थांना सुविधा मिळत नसल्याने त्यांनी नगरपंचायत हद्दीतून वगळण्यात यावे अशी मागणी केली होती. मागणीसाठी त्यांचा पाठपुरावा सुरू असून कारवाई न झाल्यास २१ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. या आंदोलनाला बुधवारपासून सुरूवात करण्यात आली.
रोषमाळ बुद्रुक येथील युवक ग्रामस्थ सध्या उपाेषणाला बसले असून वेळोवेळी मागणी मान्य होईपर्यंत ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धडगाव नगरपंचायतीत समावेश असलेल्या रोषमाळ बुद्रुक ग्रामपंचायतींतर्गत अनेक विकासकामे गेल्या पाच वर्षात पूर्ण झालेली नाहीत. केवळ लोकसंख्येचा निकष लावून धडगावपासून लांबवर असलेल्या रोषमाळ बुद्रुक गाव व पाड्यांचा नगरपंचायतीत समावेश करण्यात आला आहे. परीणामी विविध शासकीय योजनांसह पेसांतर्गत लाभापासूनही ग्रामस्थ वंचित होत आहेत. यामुळे त्यांच्याकडून राज्यपाल, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश येत नसल्याने गावातील युवकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यांतर्गत बुधवारी खर्डीपाडा येथील युवराज रोहिदास खर्डे, मानसिंगपाडा येथील संदीप नारसिंग पावरा, सिनीपाडा येथील विरसिंग गुंड्या पावरा, जेलसिंग पाडा येथील महेंद्र मोहन पावरा हे युवक उपोषणाला बसले आहेत. सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड नियमांचे पालन करुन त्यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे.