ेउसावर खोड किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:53 IST2019-05-12T20:53:38+5:302019-05-12T20:53:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस प्रभाव झपाटय़ाने ...

ेउसावर खोड किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतेत
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आहे.
परिसरात मागील काही वर्षापासून शेतकरी उसाचे उत्पादन घेत आहेत. येथील शेतकरी भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवत ज्या पिकाची मागणी आहे.त्याच पिकाची लागवड करण्यावर विश्वास ठेवाणारा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे परिसरात ऊस या व्यापारी पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या वर्षी मुख्य मान्सून व परतीचा पाऊस या दोघांनीही तालुक्याकडे पाठ फिरवल्याने सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलश्रोत आटले आहेत.
त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकाचा हंगाम धोक्यात असल्याची परिस्थिती असून शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट रूप धारण करीत असतांनाच येथील परिसरात मोठया प्रमाणात लागवड क्षेत्र असलेल्या ऊस पिकाच्या मुळावर खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठं संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून व्यापारी पिकाचा हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त होत आह़े या ठिकाणी गेल्या गळीत हंगामात मोठय़ा प्रमाणात उसतोड करण्यात आली होती़ उस उत्पादक शेतक:यांना भावदेखील ब:यापैकी मिळाला होता़ त्यामुळे येथील शेतक:यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन उसाचे पिक घेतले होत़े परंतु तीव्र उन्हाळा व पाण्याच्या कमतरतेमुळे येथील उसाचे पिक धोक्यात आल्याचे दिसून येत आह़े
दर्जा खालावला
खोड किडी रोगामुळे पिकाच्या खोडाला किड लागून हळूहळू खोड पोकळ होत जात़े यातून उसाचा दर्जा खालावत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े परिणामी उसाला बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने शेतक:यांचे आर्थिक नुकसान होत असत़े दरम्यान, याकडे कृषी विभागाने लक्ष देत शेतक:यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असताना याकडे कृषी विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतक:यांकडून करण्यात येत आह़े या ठिकाणी मोठया प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने येथील शेतक:यांचे गणित याच व्यापारी पिकावर अवलंबून असत़े त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आह़े