थकबाकी वसुलीसाठी तळोद्यातील शेतक:यांना वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:02 IST2018-05-08T13:02:25+5:302018-05-08T13:02:25+5:30
तळोदा तालुका : पाणीपुरवठा योजनांची 2 कोटींची थकबाकी

थकबाकी वसुलीसाठी तळोद्यातील शेतक:यांना वेठीस
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 8 : तळोदा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतीकडून वसुली करण्यासाठी महाविरतणतर्फे कार्यवाही करण्यात येत आह़े संबंधित ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात येणार असल्याने महावितरणकडून शेतक:यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करण्यात येत आह़े
तळोदा तालुक्यातील एकूण 94 गावे असून त्यापैकी 45 ठिकाणी पाणीपुरवठय़ांची वीज जोडणी करण्यात आली आह़े संबंधित गावांकडे एकूण 2 कोटी 12 लाख रुपयांची थकबाकी आह़े तर महावितरणकडून अद्याप केवळ 11 लाख रुपयांचीच वसुली करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आह़े
तालुक्यात एकूण 67 ग्रामपंचायती आहेत़ त्यांना जोडलेले पाडे मिळून एकूण 94 गावांची महसुली दप्तरी नोंद करण्यात आली आह़े तळोदा तालुक्याची वसुली सर्वाधिक कमी असल्याने याबाबत महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही करण्याचे पत्र प्राप्त झाले आह़े त्यानुसार थकबाकी न भरणा:या ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करावी असे आदेश यात देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े
शेतकरी धरले जाताय वेठीस
दरम्यान, महावितरणकडून थकबाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतींकडे तगादा लावला जात असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे यातून साहजिकच शेतकरी वेठीस धरले जात असल्याच्या भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहेत़ आधिच परिसरात पाण्याची पातळी खोल झाली आह़े त्यामुळे साहजिकच तालुक्यातील सपाटीवरील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारन करत असल्याचे दिसून येत आह़े अनेक ठिकाणी कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आह़े त्यामुळे अशा परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित झाल्यास पिकांना जगवावे कसे? असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत आह़े थकबाकीची वसुली करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना वारंवार पत्र पाठविण्यात आले होत़े परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मार्च महिन्यात जिल्ह्यातील 100 हुन अधिक गावांचा पाणीपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला होता़
त्यानंतर शेतक:यांचा यास विरोध झाल्यानंतर पुन्हा तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करुन शेतक:यांना निदान थकीबाकीच्या 5 टक्के रक्कम त्वरीत भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होत़े परंतु तालुक्यातून केवळ 11 लाख रुपये इतकीच वसुली झाली होती़ पुन्हा ग्रामपंचायतींकडून वीजपुरवठा खंडित करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत़ त्यामुळे साहजिकच शेतकरी चिंतातूर झाले आह़े आधिच उन्हाळा असल्याने पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आह़े त्यातच महावितरणकडून अजून पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत असल्याने शेतक:यांसमोरील चिंता अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े
खरिपासाठी पाण्याची गरज
दरम्यान, आता काहीच दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपला आह़े यात, केळी, पपई आदी विविध पिकांची शेतक:यांकडून लागवड करण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच यासाठी पाण्याची आवश्यकता आह़े महावितरवणकडून पाणीपुरवठय़ाची वीज खंडित केल्यास शेतक:यांना खरिप हंगाम घेणे कठीण जाणार असल्याची चिंता शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े