गणकीय सातबाऱ्यातील चुकांमुळे शहाद्यात शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:18 IST2019-02-19T12:18:34+5:302019-02-19T12:18:47+5:30
शहादा तालुका : तलाठी व मंडळ अधिकाºयांकडे दुरुस्तीसाठी हेलपाटेसं

गणकीय सातबाऱ्यातील चुकांमुळे शहाद्यात शेतकरी त्रस्त
शहादा : तालुक्यातील अनेक शेतकºयांचा संगणकीय सातबारा उताराच्या भोगवटा रकाना कोरा निघत असल्याने त्यातील दुरुस्तीकरिता शेतकºयांना तलाठी व मंडळ अधिकाºयांकडे हेलपाटे मारावे लागत आहे. बोंडअळीचा निधी व शासनाच्या विविध योजनांचे अनुदान खात्यावर जमा होण्यासाठी सातबारा उतारा आवश्यक आहे.
शेतकºयांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसीलदार मनोज खैरनार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकºयांच्या हितासाठी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांकडे सातबारा उतारा हा अनिवार्य आहे. गेल्या काही महिन्यापासून शेतकºयांना संगणकीय सातबारा उतारा मिळत आहे. सातबारा उतारा घेताना त्यावर अनेकांच्या नोंदी नाहीत तर काहींच्या नोंदीत चुका झालेल्या आहेत. तसेच शेतकºयांच्या शेतीचे क्षेत्रफळ किती आहे तेदेखील कमी-जास्त झालेलं दिसून येते. सातबाºयातील एक भाग म्हणजे भोगवटा या चौकटीत शेतकºयांच्या नावे असलेल्या जमिनीची नोंद नाही, जमिनीची व कुटुंबाची फोड झाली असेल तर त्याही नोंदी आढळून येत नाही. यासह अनेक दुरुस्त्या सातबाºयावर आढळून येत आहे. शेतकºयाचे नाव आहे परंतु त्याची शेत जमीन किती क्षेत्रफळ किती त्याची विभागणी आदी नोंद दिसून येत नाही. या नोंदी नसल्याने शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बोंड आळीचे अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे जाहीर केले आहे. तसेच केंद्र शासनाने दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकºयांसाठी निधी जमा करण्याचे नियोजन केलेले आहे. सातबारा उतारा निघाल्यानंतर त्याची तपासणी केली असता उताºयावर तालुक्यातील पाडळदा, कलसाडी, चिखली, कानडी, बुपकरी डामरखेडा, भागापुर, गोगापुर, डोंगरगाव, असलोद, मंदाणे यासह अनेक गावातल्या शेतकºयांच्या संगणकीय सातबारा उताºयावर नोंदी नाही किंवा चुकीची आढळून येत असल्याचे बोलले जात आहे. यातील दुरुस्तीकरिता शेतकºयांना तलाठी व सर्कल यांच्याकडे अर्ज घेऊन फेरफटका मारावा लागत आहे. अगोदरच शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन नसल्याने हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी तलाठी व सर्कल यांच्याकडे अर्ज घेऊन एक-दोन नव्हे तर आठवडाभर चकरा मारत आहे. आर्थिक वमानसिक स्थितीत अडकलेल्या शेतकºयांचा संगणकीय उताºयाबाबत महसूल विभागाचे उपविभागीय प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत सातारकर व तहसीलदार मनोज खैरनार यांनी सातबारा उतारातील येत असलेल्या चुकीची दुरुस्ती करिता सर्कल व तलाठी यांना तातडीने दुरूस्त्या करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी होत आहे.