रस्त्याअभावी शेतकऱ्यांचा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:55 IST2020-07-31T12:55:47+5:302020-07-31T12:55:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूरहून आवगेकडे जाणाऱ्या मार्गावरील शेतात जाणाºया रस्त्यावर शेतकऱ्यांचा पायपीट करण्याचा संघर्ष कधी ...

रस्त्याअभावी शेतकऱ्यांचा संघर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूरहून आवगेकडे जाणाऱ्या मार्गावरील शेतात जाणाºया रस्त्यावर शेतकऱ्यांचा पायपीट करण्याचा संघर्ष कधी संपणार? असा संतप्त प्रश्न शेतकºयांकडून केला जात आहे.
रस्ता म्हणजे शेतीच्या रक्तवाहिन्या असतात. रस्त्यांची सोय नसलेल्या शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याअनुषंगाने शेत तिथे रस्त्याची घोषणा केली आहे. परंतु शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील शेतकºयांची शेती गोदीपूर-आवगे रस्त्यावर असून येथे अजूनपर्यंत रस्ता बनला नसल्याने शेतकºयांना शेतात शेत तयार करण्यापासून किंवा शेतमजूर घेऊन जावे लागते, बी-बियाणे, खते असतील किंवा शेतमाल निघाला असेल तर बैलगाडी, ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो. परंतु या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल राहत असल्याने दोन ते तीन किलोमीटर पायपीट करीत शेतमाल घेऊन जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो.
रस्ता केवळ कागदोपत्री
गेल्या दोन वर्षापासून गोदीपूरहून आवगे हा रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. त्यानंतर अनेकदा मोजमापदेखील झाल्याची माहिती शेतकºयांनी दिली. परंतु हा रस्ता तयारच झाला नसल्याचे समोर आले आहे. मग हा रस्ता कागदोपत्री तर झाला नाही ना? असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.