पीक कर्जासाठी २२ रोजी शेतकरी मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:18 IST2020-06-18T12:18:28+5:302020-06-18T12:18:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ...

Farmers should meet on 22nd for crop loan | पीक कर्जासाठी २२ रोजी शेतकरी मेळावे

पीक कर्जासाठी २२ रोजी शेतकरी मेळावे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कर्ज मिळविणे सुलभ व्हावे यासाठी २२ जून रोजी जिल्ह्यातील १०५ बँक शाखांमार्फत पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधतांना दिली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बँक मेळाव्याच्या माध्यमातून अर्ज स्विकारले जातील व त्याच ठिकाणी कजार्साठी आवश्यक प्रक्रीया पूर्ण केली जाईल. मेळाव्याच्या ठिकाणी शेतकरी उपस्थित राहू शकत नसल्यास ग्रामसेवक किंवा तलाठी यांना अर्ज द्यावेत. हे अर्ज मेळाव्यात आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ७०४ सातबारे आहेत. १ लाख ६६ हजार शेतकरी शेती करत आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. १ लाख १७ हजार ८०० शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येत आहेत. जिल्ह्यात १०५ प्रकारच्या बँक शाखा असून गतवर्षी जिल्ह्याचे पीक कर्जाचे उद्दीष्ट ७२९ कोटी होते. त्यापैकी ४० टक्के उद्दीष्ट गाठण्यात आले होते. या वर्षी ७६९ कोटींचा पीक कर्ज आराखडा बनविण्यात आला आहे.
पीक कर्जासाठी शेतकºयांना वेबलिंकवर माहिती भरायची आहे. या माहितीसोबत कजार्साठी वेगळा अर्ज भरायचा आहे. वेब लिंकवरील माहितीवरून जिल्हा प्रशासन बँकाकडे शेतकºयांना कर्ज मिळण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. बँकांनी १० दिवसात अर्जावर कार्यवाही करून शेतकºयास पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे.
पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या सर्व शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे. अशा लाभार्थी शेतकºयांना सातबारा आणि पीकपेरा अशी दोनच कागदपत्रे अर्जासोबत सादर करावे लागतील. यासोबत नव्याने कर्ज घेणाºया शेतकºयांनादेखील १० दिवसात कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. मागच्या वर्षी कर्जमाफी योजनेत नाव आलेल्या शेतकºयांना रिझर्व्ह बँकेकडून निर्देश आल्यावर कर्ज मिळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले नसेल त्यांना १ लाख ६० हजारापर्यंत कर्ज देण्यासाठी कर्जाची नोंद सातबाºयावरही घेण्यात येत नाही. अशा शेतकºयांनी अर्जासोबत सातबारा, आधारकार्ड, पॅनकार्ड, आठ अ, फेरफाराची नक्कल, चतु:सिमा, बागायती असेल तर सातबारा विहीरीची नोंद, पीक पेरा प्रमाणपत्र, ऊस लागवड असेल तर साखर कारखान्याचे प्रमाणपत्र आदी १२ कागदपत्रे आवश्यक असतील.

Web Title: Farmers should meet on 22nd for crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.