शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीने डिझेल मिळावे- किसान सेनेतर्फे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST2021-03-05T04:31:33+5:302021-03-05T04:31:33+5:30
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांनी केंद्र आणि राज्य यांनी मिळून ५० टक्के ...

शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीने डिझेल मिळावे- किसान सेनेतर्फे मागणी
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांनी केंद्र आणि राज्य यांनी मिळून ५० टक्के संयुक्त भार उचलावा व शेतकऱ्यांवर पडणारा बोजा कमी करावा. संयुक्त बैठकीमधून केंद्र व राज्य यांनी तो अधिकार त्यांनी उचलावा, अशी मागणी करीत आहोत. याचा निर्णय लवकरात लवकर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येवु नये. राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. त्यातच आता इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होत आहे. परिणामी या मागणीचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. निवेदनावर
महाराष्ट्र राज्य महासचिव पंडित तडवी, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुभाष नाईक, उत्तर महाराष्ट्र संघटक सुरेश जगदेव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतिलाल जाधव यांच्या सह्या आहेत.